नाशिक : योग्य वयात योग्य निर्णय घेतला तर तोच निर्णय भविष्यात आपल्याला फायदेशीर ठरत असतो. याच विचाराने नाशिकच्या 24 वर्षाच्या दर्शन जोशी या तरुणाने नोकरी सोडून स्वतःचा एक क्लोरा इंटरप्राइजेस नावाने टीशर्ट प्रिंटिंगचा अनोखा व्यवसाय सुरू केला आहे. यामध्ये त्याला महिन्याला बक्कळ कमाई होत आहे.
दर्शन याने कॉमर्स क्षेत्रातून बी.कॉमची डिग्री घेतली आणि त्या नंतर दोन ठिकाणी नोकरी देखील करून बघितली. परंतु नोकरीत हवा तसा पगार आपल्याला मिळत नाही आणि त्याने आपल्या गरजा देखील भागत नाही. त्यातच संपूर्ण दिवस हा दुसऱ्यासाठी द्यावा लागतो. त्यामुळे योग्य असा मोबदला मिळत नसल्याने आपण स्वतःचा व्यवसाय करू असा निर्णय घेतला असल्याचे लोकल 18 सोबत बोलताना दर्शन याने सांगितले.
advertisement
शिक्षण आठवी नापास, 50 रुपयांसाठी काम करणारा तरुण कमतोय आता महिन्याला 2 लाख!
कशी सुचली आयडिया?
दर्शन याच्या भावाची टीशर्ट बनविण्याची कंपनी आहे. त्या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात टीशर्ट बनत असतात. आणि यातील काही टीशर्ट हे प्रिंटिंगसाठी बाहेर जात असतात. हा प्रिंटिंगचा व्यवसाय आपण सुरू केला तर भावाचा वेळ ही वाचेल. तसेच बाहेर सर्व टीशर्ट्ससाठी जास्त प्रमाणात पैसे मोजावे लागतात. ते देखील कमी होईल आणि आपल्याला देखील एक स्वतःचा रोजगार मिळेल. या हेतूने दर्शन याने हा व्यवसाय सुरु केला.
किती होते महिन्याला कमाई?
दर्शन हा रोजचे किमान 50 ते 60 टीशर्ट्स स्वतःहा प्रिंटिंग करून तयार करत असतो. तसेच कोणाला वाढदिवसासाठी किंवा कुठे भेट वस्तू द्यायची असल्यास त्या पद्धतीचे पाणी बॉटल, टोपी, कप असे अनेक वस्तू बनवून देत असतो. या व्यवसायाच्या माध्यमातून दर्शन हा महिन्याला 60 ते 70 हजारांची कमाई करतो.
कुठे आहे दुकान?
शॉप नंबर 1, सावतानगर, निअर बाय नागेश्वर मंदिर, शिवछाया ज्वेलर्स च्या शेजारी, सिडको या ठिकाणी क्रोला इंटरप्राइजेस नावाने दुकान आहे.