1 आयकर नियमात बदल
आता फॉर्म नंबर 16 जाणार असून त्या जागी 130 फॉर्म येणार आहे. Financial Year आणि Assessment Year या जागी टॅक इयर असणार आहे. ज्या वर्षात तुम्ही कमवणार त्याच वर्षाचा टॅक्स तुम्ही भरायचा आहे. HRA च्या नियमातही बदल करण्यात आला आहे. रेंटने जर घर असेल तर त्याला पॅनकार्ड आणि रेंट पेमेंटची रिसिट अनिवार्य असणार आहे. 50 टक्के HRA मधून सूट मिळणार आहे. याशिवाय सॅलरी स्लीपमध्येही बदल करण्यात येणार आहेत. आयटीआर फायलिंगची तारीख यापूर्वी 31 जुलै होती ती वाढवण्यात आली असून आता 31 ऑगस्ट करण्यात आली आहे.
advertisement
2 PAN कार्डबाबत बदलणार नियम
आता फक्त आधार कार्डच्या मदतीने पॅनकार्ड तयार केलं जाणार नाही. त्यासाठी खास फॉर्म (93-96) भरावा लागणार आहे. इतकंच नाही जर तुमचं आधार आणि पॅनकार्डवरील नाव जुळलं नाही त्यात एक छोटीशी जरी चूक असेल तर तातडीनं ते बंद होऊ शकतं किंवा निष्क्रिय केलं जाऊ शकतं. 10 लाखांचं कॅश ट्रान्झॅक्शन, 5 लाख गाडी खरेदी करण्यासाठी किंवा कोणत्याही प्रॉपर्टीचे व्यवहार करण्यासाठी आता Pan card अनिवार्य असणार आहे.
3 बँकिंग संदर्भात मोठे बदल
बँकेत आपण प्रत्यक्षात जात नसलो तरी तो आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. तुम्ही 10 लाखांहून अधिक पेमेंट करत असाल तर तुम्हाला आयकर विभागाला माहिती देणं आवश्यक आहे. बिल भरण्यासाठी क्रेडिट कार्डवर आता 1 टक्के बिल लागणार आहे. UPI ने ट्रान्झेक्शन करणाऱ्यांसाठी मंथली फ्री लिमिट संपल्यानंतर तुम्हाला 23 रुपये प्रति ट्रान्झेक्शन चार्ज लागणार आहे.
4 डिजिटल पेमेंट आणि सुरक्षा
ऑनलाईन फसवणुकीला लगाम घालण्यासाठी आरबीआयने 'टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन' 2FA अनिवार्य केले आहे. आता ओटीपी OTP टाकून काम होणार नाही. त्यासोबतच बायोमेट्रिक्स (ठसा किंवा फेस आयडी) किंवा डिव्हाइस बाइंडिंग यांसारख्या दोन सुरक्षा मानकांचा वापर करावा लागेल. यामुळे तुमचे बँक खाते हॅकर्सपासून अधिक सुरक्षित होईल.
5 रेल्वे तिकीट रद्द करणं आता महागणार!
जर तुम्ही ऐनवेळी रेल्वे तिकीट कॅन्सल करत असाल, तर आता सावध व्हा. रेल्वेने तिकीट रद्द करण्याचे नियम अधिक कडक केले आहेत. आता ट्रेन सुटण्यापूर्वी किमान ८ तास आधी तिकीट रद्द केल्यासच रिफंड मिळण्याची शक्यता असेल. पूर्वी ही मुदत ४ तासांची होती. मात्र, आता ८ तासांच्या आत तिकीट रद्द केल्यास तुम्हाला एक रुपयाही परतावा Refund मिळणार नाही. त्यामुळे प्रवासाचे नियोजन आता अधिक विचारपूर्वक करावे लागेल.
6 शेअर बाजार आणि सोन्यातील गुंतवणूक महागली
शेअर बाजारात 'फ्युचर्स अँड ऑप्शन्स' (F&O) मध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. ऑप्शन्सवर लागणारा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स ०.१% वरून वाढवून ०.१५% करण्यात आला आहे. जर तुम्ही गोल्ड बॉन्ड दुय्यम बाजारातून खरेदी केले असतील, तर आता मॅच्युरिटीवर तुम्हाला कॅपिटल गेन्स टॅक्स भरावा लागेल. टॅक्स सवलत फक्त मूळ खरेदीदारांनाच मिळेल.
7 हातात पगार कमी येणार
तुमचा Basic Pay आणि महागाई भत्ता हा तुमच्या एकूण पगाराच्या ५०% असणे अनिवार्य आहे. यामुळे तुमचा पीएफ (PF) आणि ग्रॅच्युइटीमध्ये वाढ होईल, जे भविष्यासाठी चांगलं आहे. मात्र, सध्या दरमहा हातात येणारा पगार काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
