कसं चेक करायचं?
तुमच्या नावाच्या पॅनकार्डवर कुणी कर्ज घेतलं की नाही त्याचा कोणी गैरवापर केला का ते तुम्ही तपासू शकता. तुमची फसवणूक टाळण्यासाठी ते वेळोवेळी तपासून पाहाणं गरजेचं आहे. तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर करून तुमच्या नावावर कोणतेही कर्ज घेतले आहे का, हे तपासण्याचा पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा क्रेडिट रिपोर्ट तपासून पाहा. सिबिल, एक्सपेरियन आणि इक्विफॅक्स यांसारख्या क्रेडिट ब्युरोमध्ये तुम्हाला तुमच्या सर्व सक्रिय आणि जुन्या क्रेडिट व्यवहारांची सविस्तर माहिती मिळते.
advertisement
तर अडचणी निर्माण होऊ शकते
जर तुमच्या नावावर कोणतेही कर्ज नसले तरी याचा अर्थ असा नाही की तुमच्या पॅन कार्डचा गैरवापर झालेला नाही. तुमच्या खात्यावर झालेल्या चौकश्यांची संख्या तपासा. जर तुम्हाला काही संशयास्पद तपशील दिसले, तर त्यांची माहिती क्रेडिट ब्युरोला त्वरित द्या, तुमच्या पॅनकार्डचा कोणी गैरवापर करत असेल तर तुम्ही अडचणी येण्याची शक्यता असते.
तुमच्या नावावर जर फसवून कर्ज घेतलं असेल तर काय करायचं?
तुमच्या नावावर एखाद्या फसवणूक करणाऱ्याने कर्ज घेतले असेल तर आधी शांत व्हा, चिडचिड करून, डोक्याला ताण देऊन घाईत चुकीचे निर्णय घेऊ शकता.संबंधित Bank Manager सविस्तर तक्रार लिहा आणि त्याची पोचपावती घ्या. बँकेकडे अधिकृतपणे तुमची तक्रार नोंदवा. जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करा. या फसवणुकीचे सर्व तपशील, बँकेतील तक्रारीची प्रत आणि पोलीस तक्रारीची प्रत एकत्र करून आरबीआय लोकपालाला ईमेल करा.
पॅन कार्डचा गैरवापर कसा टाळावा?
आजकाल बहुतेक व्यावसायिक व्यवहारांसाठी आधार कार्ड आणि पॅन कार्डची माहिती आवश्यक असते, त्यामुळे तुम्ही नेहमीच सतर्क राहणे आवश्यक आहे. तुमच्या पॅन कार्डची माहिती असुरक्षित वेबसाइट्स, व्हॉट्सॲप फॉरवर्ड्स किंवा संशयास्पद विक्रेत्यांना देऊ नका. जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, तर तात्काळ डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करा आणि पुढील काही महिन्यांसाठी तुमचा क्रेडिट रिपोर्ट नियमितपणे तपासा. तुमच्या आर्थिक खात्यांसाठी पासवर्ड सोपा ठेवू नका. पॅनशी जोडलेल्या कर्ज किंवा क्रेडिट अर्जांसाठी एसएमएस/ईमेल सूचना सुरू ठेवा. ज्याद्वारे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील.
