PAN Card Update: 15 सप्टेंबरआधीच करा हे काम नाहीतर होईल मोठं नुकसान, सरकारने दिली महत्त्वाचे अपडेट्स
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Pan Card: पॅनकार्ड महत्त्वाचं असून 15 सप्टेंबरपर्यंत नाव बदलण्याची मुभा आहे. नावात चूक असल्यास बँकिंग, आयटीआरमध्ये अडचणी येऊ शकतात. NSDL वेबसाईटवर फॉर्म भरून सुधारणा करा.
आजकाल पॅनकार्ड खूपच महत्त्वाचं झालं आहे. आयकर भरणं असो किंवा 50 हजारपेक्षा जास्त रक्कम कुणाला ट्रान्सफर करायची असो पॅनकार्ड आणि पॅन नंबर हा देणं बंधनकारक झालं आहे. त्यामुळे पॅनकार्ड जर वेळोवेळी अपडेट केलं नाही तर बँकिंग सेवेत अडचणी येऊ शकतात. याशिवाय आयटीआरसाठी देखील अडचणी येऊ शकतात. तुमच्याकडे पॅनकार्ड असेल तर तातडीनं 15 सप्टेंबरपर्यंत हे काम करून घ्या नाहीतर तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
पॅनकार्डचं महत्त्व
तुमचं पॅन कार्ड हे तुमच्या ओळखीचं आणि आर्थिक व्यवहारांसाठी अत्यावश्यक असलेलं डॉक्युमेंट आहे. त्यामुळे त्यावर नावात जर थोडीशीही चूक असेल किंवा लग्नानंतर सरनेम बदलला असेल, तर लगेच सुधारणा करणे गरजेचे आहे. अन्यथा बँकिंग, इनकम टॅक्स किंवा सरकारी कामकाजाच्या वेळी तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून तुम्हाला 15 सप्टेंबरपर्यंत सरकारकडून नाव बदलण्याची मुभा देण्यात आली आहे.
advertisement
नाव आडनाव कधी बदलायची गरज?
पॅन कार्डावर नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असल्यास नाव बदलण्याची गरज लागू शकते. कोर्ट किंवा गॅझेटद्वारे नाव बदलल्यानंतर अधिकृत नावात बदल करण्याची गरज असते. विशेषतः महिलांनी विवाहानंतर आडनाव बदलल्यास नाव आणि आडनाव बदलावं लागू शकतं.
advertisement
पॅन कार्ड नाव बदलण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया
NSDL वेबसाईटवर लॉगिन करा: https://www.tin-nsdl.com या अधिकृत साइटवर जा.
फॉर्म निवडा: Correction/Change Request या ऑप्शनखाली पॅन अपडेट फॉर्म भरायचा आहे.
सर्व माहिती भरा: नाव, पत्ता, जुना पॅन नंबर यांसह आवश्यक डिटेल्स नीट भराव्यात.
डॉक्युमेंट सबमिट करा
स्पेलिंग दुरुस्ती: आधार कार्ड, पासपोर्ट यासारखी योग्य डॉक्युमेंट्स अपलोड करा.
advertisement
लग्नानंतर सरनेम बदल: मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक असेल.
नाव बदल: गॅझेट नोटिफिकेशन किंवा कोर्ट ऑर्डर द्या.
फी भरा: भारतीय पत्त्यासाठी साधारण 105 रुपये तर परदेशी पत्ता असल्यास 1,020 रुपये फी लागू शकते.
फॉर्म सबमिट करा: सर्व तपशील भरून फॉर्म अंतिम सबमिट करा.
advertisement
पॅन कार्ड किती दिवसात अपडेट होईल?
तुम्ही ही सगळी माहिती जमा केल्यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर 7-10 दिवसांत ई-पॅन मेलद्वारे उपलब्ध होईल. ई पॅन त्याला म्हणता येईल. हे ई पॅन तुम्ही सगळीकडे जोडू शकणार आहात. पोस्टाद्वारे साधारण 15-45 दिवसांत नवीन फिजिकल पॅन कार्ड तुमच्या पत्त्यावर मिळेल. जर तुमच्या पत्त्यावर पॅनकार्ड आलं नाही तर तुम्ही या साइटवर जाऊन तिथे तुमची क्वेरी टाकू शकता.
advertisement
NSDL वेबसाइटवर Acknowledgement Number टाकून तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस सहज तपासू शकता. आजकाल बँकिंग, शेअर्स, म्युच्युअल फंड, सरकारी योजनांसाठी पॅन कार्ड हे अत्यावश्यक झाले आहे. त्यामुळे नावात जर कोणतीही गडबड असेल तर तातडीने सुधारणा करा. उशीर केल्यास आर्थिक व्यवहारात अडचणी येऊ शकतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 26, 2025 11:26 AM IST
मराठी बातम्या/मनी/
PAN Card Update: 15 सप्टेंबरआधीच करा हे काम नाहीतर होईल मोठं नुकसान, सरकारने दिली महत्त्वाचे अपडेट्स


