या बैठकीत देशातील विद्यमान 4 जीएसटी स्लॅबऐवजी फक्त 2 स्लॅब ठेवण्याचा विचार आहे. त्यामुळे अनेक वस्तू स्वस्त होतील तर काही महाग होण्याची शक्यता आहे.
सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत जे 5%, 12%, 18% आणि 28%. सरकार 28% आणि 12% हे स्लॅब रद्द करून फक्त 5% आणि 18% असे दोन स्लॅब ठेवण्याच्या तयारीत आहे. यामुळे कर दर कमी झाल्याने अनेक वस्तूंच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे.
advertisement
मग असं असेल तर काय स्वस्त होऊ शकतं?
शूज, कपडे, औषधे, ट्रॅक्टर, तूप, लोणी, ड्रायफ्रूट्स, कॉफी यांसारख्या वस्तूंवरचा जीएसटी 12% वरून 5% केला जाऊ शकतो.
एसी, फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, सिमेंट यांसारख्या इलेक्ट्रिक वस्तूंवर 28% वरून 18% जीएसटी लावला जाऊ शकतो.
मुलांच्या शिक्षणाशी संबंधित साहित्य पेन्सिल, सायकल, नकाशे, ग्लोब यांचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
सायकल, छत्री, हेअर पिन, टेक्सटाइल, कार्पेट, रेडिमेड कपडे, फुटवेअर, टायर्स, खत, शॅम्पू, साबण, टूथपेस्ट यावरही 12% वरून 5% पर्यंत जीएसटी कमी होऊ शकतो.
काय महाग होईल?
सरकारचा दर रोजच्या गरजेच्या वस्तूंवर सवलत देण्यावर आहे, मात्र काही लक्झरी वस्तूंवर कर वाढवला जाणार आहे.
सिन, लक्झरी आणि डिमेरिट गुड्सवर 40% पर्यंत विशेष कर लागू करण्याचा विचार आहे.
लक्झरी कार, दारू, पान मसाला, तंबाखू, शुगर ड्रिंक्स, फास्ट फूड महाग होऊ शकतात. केमिकल वुड पल्प, गॅस माइनिंग सर्व्हिस, बिझनेस क्लास एअर तिकीट यावर जीएसटी 18% पर्यंत वाढवला जाऊ शकतो.
इतर महत्त्वाचे बदल
– आरोग्य विम्यावर जीएसटी हटवण्याचा विचार आहे.
– छोटी कार 28% वरून 18% जीएसटीमध्ये येऊ शकते.
– 7,500 रुपयांखालील हॉटेल रूम भाड्यावर जीएसटी 12% वरून 5% होण्याची शक्यता आहे.
या बदलांमुळे सुमारे 175 वस्तूंवरील जीएसटी दर कमी होऊ शकतो आणि ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.