हा नियम तीन भागांमध्ये विभाजित झाला आहे. पहिला '2' आहे. याचा अर्थ होतो की, साहित्याची एकूण किंमत जी तुमच्या महिन्याच्या सॅलरीच्या अर्ध्यापेक्षा जास्त नसावी. म्हणजेच 2 आठवड्यांच्या कमाईपेक्षा जास्त नसावी.
सावधान! 'या' 5 कारणांमुळे बँक फ्रीज करु शकतं तुमचं अकाउंट, अवश्य घ्या जाणून
उदाहरणार्थ, तुम्ही महिन्याला 50 हजार रुपये कमवत असाल, तर त्या वस्तूवर जास्तीत जास्त 25 हजार रुपये खर्च करा. तुमचा हातातला पगार 40 हजार रुपये असला तरी, 20 हजार रुपयांपर्यंतचा फोन ठिक आहे. एक किंवा दोन महिन्यांचा संपूर्ण पगार फोनवर खर्च करणे ही एक मोठी आर्थिक चूक आहे. कारण खरेदी केल्यानंतर फोनची किंमत 20 टक्क्यांनी कमी होते आणि एका वर्षानंतर त्याची रीसेल व्हॅल्यू निम्म्यापेक्षा कमी होते. उदाहरणार्थ, 50 हजार रुपयांचा फोन 25 हजार रुपयांनाही विकला जाणार नाही.
advertisement
EMI चा कालावधी
यानंतर ‘6’ म्हणजेच ईएमआयचा कालावधी 6 महिन्यांहून जास्त नसावा. 18-24 महिन्यांच्या ईएमआयसारख्या दीर्घ मुदतीच्या ईएमआयमुळे तुम्हाला समान रक्कम भरावी लागते, ज्यामुळे आर्थिक ताण वाढतो. यामुळे कर्जावर व्याजही वाढते. कमी मुदतीच्या ईएमआयमुळे तुम्ही लवकर कर्जमुक्त होऊ शकता आणि ताण कमी करू शकता.
10 टक्क्यांहून जास्त नसावा मंथली ईएमआय
नंतर '10' येते. याचा अर्थ होतो की, ज्याचा मासिक ईएमआय तुमच्या महिन्याच्या एकूण कमाईच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. तुम्ही इन-हँड सॅलरी 40 हजार असेल. तर ईएमआय 4 हजारांहून जास्त नसावा. यामुळे घराचे बजेट बिघडत नाही. सेव्हिंग्स सुरक्षित राहतात आणि क्रिडिट स्कोअरही चांगला राहतो. ईएमआय जास्त असेल तर रोजच्या खर्चांवर परिणाम होतो.
पोस्ट ऑफिसच्या नावावर मेसेज आलाय? एका क्लिकमध्ये रिकामं होऊ शकतं अकाउंट, व्हा अलर्ट
हा नियम काम करतो कारण आजकाल EMI खूप सोपे आहेत. परंतु ते दीर्घकाळात वाईट सवयींना कारणीभूत ठरू शकतात. लहान ईएमआय कमी ओझे वाटू शकतात, परंतु एकूण व्याज जास्त असते. तुम्ही हा ‘2-6-10’ नियम पाळलात, तर महागड्या वस्तू खरेदी करणे त्रासदायक नाही तर मजेदार असेल.
