TRENDING:

Budget 2026: बजेटमधील 10,000 कोटींच्या घोषणेने बाजार हादरला, गुंतवणूकदार झाले बेभान; शेअर बाजाराचा मोठा रिस्पॉन्स

Last Updated:

Budget 2026 Biopharma Shakti: केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये “बायोफार्मा शक्ती” उपक्रमाची घोषणा होताच फार्मा शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. भारताला जागतिक बायोफार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्याच्या सरकारच्या निर्णयाला बाजारातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

advertisement
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताला जागतिक बायोफार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून उभे करण्यासाठी मोठी घोषणा केल्यानंतर फार्मा शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. सरकारने ‘बायोफार्मा शक्ती’ या नव्या उपक्रमाची घोषणा करत पुढील पाच वर्षांसाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
News18
News18
advertisement

या योजनेचा मुख्य उद्देश बायोलॉजिक्स आणि बायोसिमिलर्सच्या देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि उच्च मूल्याच्या बायोफार्मा क्षेत्रात भारताची जागतिक स्पर्धात्मकता वाढवणे हा आहे.

या घोषणेनंतर बाजारात सकारात्मक वातावरण दिसून आले. सकाळी 11.15 वाजेपर्यंत बायोकॉनचा शेअर 2.5 टक्क्यांनी वाढून 375.90 रुपयांवर पोहोचला आणि तो आघाडीचा वाढीव शेअर ठरला. याशिवाय पिरामल फार्मा, सन फार्मा आणि टॉरेंट फार्मा या कंपन्यांचे शेअर्सही चांगल्या वाढीसह व्यवहार करत होते.

advertisement

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, सरकारकडून मिळणारा धोरणात्मक पाठिंबा पुढील काळात फार्मा कंपन्यांच्या वाढीला बळ देऊ शकतो. विशेषतः कॉम्प्लेक्स जेनेरिक्स, बायोलॉजिक्स आणि कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सक्रिय असलेल्या कंपन्यांना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/मनी/
Budget 2026: बजेटमधील 10,000 कोटींच्या घोषणेने बाजार हादरला, गुंतवणूकदार झाले बेभान; शेअर बाजाराचा मोठा रिस्पॉन्स
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल