TRENDING:

PM Modi : विकसनशील देशांचा आवाज बुलंद करु शकतात ट्रॉयकाचे सदस्य, पंतप्रधान मोदींना विश्वास!

Last Updated:

G20 summit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेटवर्क 18 सोबत खास बातचीतमध्ये म्हटलं की, ग्लोबल साउथचे तीन सदस्य - इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील - G-20 च्या ट्रोइकामध्ये सामील होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे विकसनशील देशांचे हित जोपासण्यास मदत होईल.

advertisement
PM Narendra Modi Interview G20 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनी कंट्रोल डॉट कॉमला मुलाखत दिली. या संभाषणात पंतप्रधान म्हणाले की, G-20 च्या ट्रॉयकामध्ये ग्लोबल साउथ - इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील या तीन सदस्यांचा समावेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे विकसनशील देशांचे हित जोपासण्यास मदत होईल. G-20 चा ट्रॉयका तीन देशांच्या अशा ग्रुपला म्हटलं जातं, ज्यामध्ये G-20 च्या मागील, वर्तमान आणि आगामी बैठकांचे यजमान सामिल होतात. भारत सध्याच्या G-20 शिखर परिषदेचे यजमानपद भूषवत आहे, तर मागील एक इंडोनेशियामध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढील आयोजन ब्राझीलमध्ये होणार आहे.
जी 20 समीट
जी 20 समीट
advertisement

मोदी म्हणाले, 'जी-20 च्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा केवळ विकसनशील देशांचा (इंडोनेशिया, भारत आणि ब्राझील) ट्रॉयकामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या मते, ग्लोबल स्तरावर भू-राजकीय परिस्थितीमुळे तणाव वाढलेला असताना हा ट्रॉयका विकसनशील देशांचा बुलंद आवाज बनू शकतो. पंतप्रधान म्हणाले की, भारत ग्लोबल साऊथची बाजू मांडत आहे आणि G-20 सह सर्व बहुपक्षीय मंचांवर आपल्या चिंतांबद्दल बोलत आहे. ते म्हणाले, 'हे असे देश आहेत ज्यांच्या वेदना आपण अनुभवू शकतो. विकसनशील देशांच्या गटात आमचाही समावेश असल्याने त्यांच्या आकांक्षा आपल्याला समजतात.

advertisement

व्यापार धोरणातील भेदभाव खपवून घेतला जाणार नाही

नेटवर्क 18 शी बोलताना मोदी म्हणाले की, निष्पक्ष व्यापार धोरणे हा G20च्या अजेंडाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण त्याचा दीर्घकाळापर्यंत संपूर्ण जगाला थेट फायदा होईल. पंतप्रधान म्हणाले की, G-20 च्या अध्यक्षतेखाली भारत अशा एका अजेंड्याला पाठिंबा देत आहे जो स्थिर, पारदर्शक आणि निष्पक्ष व्यापार सिस्टमला प्रोत्साहन देतो ज्यामुळे सर्वांना फायदा होतो.

advertisement

जागतिक व्यापार संघटना (WTO) मजबूत करण्याचा सल्ला देत मोदी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय संबंधांना लोकशाही स्वरूप देणे आवश्यक आहे. भेदभावरहित व्यापार धोरणांचा आग्रह धरण्याबरोबरच भारताने विकसनशील देशांच्या कर्जाच्या चिंतेंशी संबंधित मुद्दाही उपस्थित केला आहे. कर्जबाजारी देशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आम्ही बहुपक्षीय स्तरावर गोष्टी मजबूत करण्याच्या दिशेने काम करत असल्याचं देखील पंतप्रधान मोदींनी सांगितलं. मनी कंट्रोलला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखत दिली.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
PM Modi : विकसनशील देशांचा आवाज बुलंद करु शकतात ट्रॉयकाचे सदस्य, पंतप्रधान मोदींना विश्वास!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल