हा व्यवसाय सुरू करण्याआधी अनुष्का केक आणि इतर पदार्थ बनवायला शिकत होती. तिचा मित्र आदित्य ढेकरे, ज्याचे पूर्वी क्लाऊड किचन होते, त्याच्याकडून तिला व्यवसायाचे बरेच काही शिकायला मिळाले. या अनुभवाच्या जोरावर तिने स्वतःचा 'मस्त चमचमीत' फूड स्टॉल सुरू केला, जिथे संध्याकाळी सात ते अकरा पर्यंत लोकांना चमचमीत नॉनव्हेज पदार्थांची मेजवानी मिळते.
advertisement
तिच्या स्टॉलवर बोंबील फ्राय, प्रॉन्स फ्राय, सुरमई, पापलेट, चिकन बिर्याणी असे विविध स्वादिष्ट पदार्थ मिळतात. अनुष्काची खासियत म्हणजे सुरमई आणि खेकडे, ज्यांच्या स्वच्छतेची ती विशेष काळजी घेते. म्हणूनच, तिच्या ग्राहकांना पदार्थ नेहमीच ताजे आणि उत्तम दर्जाचे मिळतात.
अनुष्का सांगते, "कॉर्पोरेट जॉब करून पाहिला, पण व्यवसायाचं स्वप्न स्वस्थ बसून देत नव्हतं. माझ्या मस्त चमचमीत स्टॉलमधले पदार्थ विशेषत: मच्छी, स्वच्छ आणि चविष्ट असते, म्हणून लोक इथे आवर्जून येतात."
जर तुम्हालाही चमचमीत पदार्थांची चव घ्यायची असेल, तर प्रभादेवीच्या या 'मस्त चमचमीत' स्टॉलला नक्की भेट द्या!