ऑक्टेन रेटिंगचा खेळ
रेगुलर आणि प्रीमियम पेट्रोलमधील सर्वात मोठा तांत्रिक फरक म्हणजे ऑक्टेन रेटिंग.
काय असते ऑक्टेन रेटिंग?
सोप्या भाषेत सांगायचे तर, इंधन इंजिनमध्ये किती व्यवस्थित जळते, हे या रेटिंगवरून ठरते. जर इंधन वेळेआधीच जळले, तर इंजिनमधून 'कट-कट' असा आवाज येतो, ज्याला 'नॉकिंग' म्हणतात. भारतातील रेगुलर पेट्रोलची ऑक्टेन रेटिंग साधारण 78 ते 91 असते, तर प्रीमियम पेट्रोलची रेटिंग 91 ते 95 च्या दरम्यान असते. जास्त ऑक्टेनमुळे इंधन इंजिनमध्ये अतिशय सुलभतेने जळते आणि इंजिनचे नुकसान टाळते.
advertisement
इंजिनची अंतर्गत स्वच्छता
प्रीमियम पेट्रोल महाग असण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यामध्ये मिसळले जाणारे एडिटिव्हज किंवा रसायने. यामध्ये केवळ मूलभूत साफसफाई करणारे घटक असतात. यामध्ये प्रगत डिटर्जंट्स आणि रसायने असतात, जी सक्रियपणे इंजिनच्या आत साचलेला कार्बन साफ करतात. यामुळे फ्युएल इंज्युटर आणि वॉल्व्ह सारखे महत्त्वाचे भाग दीर्घकाळ टिकतात आणि इंजिनमध्ये कचरा जमा होत नाही.
तुमच्या गाडीसाठी कोणते योग्य?
अनेकांना वाटते की प्रीमियम पेट्रोल टाकले की गाडी जास्त मायलेज देईल, पण हे पूर्णपणे तुमच्या गाडीच्या इंजिनवर अवलंबून आहे. आपण रोजच्या वापरासाठी वापरतो त्या स्कुटर किंवा साध्या कारसाठी रेगुलर पेट्रोल पुरेसे असते. या गाड्यांचे इंजिन कमी दाबावर (Low Compression) काम करण्यासाठी बनवलेले असते.
पण जर तुमच्याकडे हाय-परफॉर्मन्स इंजिन असलेली महागडी गाडी असेल, तर मात्र प्रीमियम पेट्रोल वापरणे अनिवार्य आहे. अशा गाड्यांमध्ये प्रीमियम पेट्रोलमुळे इंजिनची क्षमता आणि कार्यक्षमता वाढते.
प्रीमियम पेट्रोल महाग का असते?
प्रीमियम पेट्रोल महाग असण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत. पहिले म्हणजे, हे इंधन शुद्ध करण्याची प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची असते. दुसरे म्हणजे, त्यामध्ये वापरले जाणारे महागडे केमिकल्स आणि एडिटिव्हज, जे इंजिनचे आयुष्य वाढवण्यास मदत करतात.
जर तुमच्याकडे साधी फॅमिली कार किंवा बाईक असेल, तर 2 रुपयांची अतिरिक्त वाढ सोसून प्रीमियम पेट्रोल भरण्याची तशी गरज नाही. मात्र, दर 3-4 महिन्यांतून एकदा प्रीमियम पेट्रोल भरल्यास इंजिनमधील कार्बन साफ होण्यास मदत होऊ शकते. शेवटी, तुमच्या गाडीच्या मॅन्युअलमध्ये कंपनीने कोणते इंधन सुचवले आहे, हे पाहणे कधीही श्रेयस्कर.
