TRENDING:

जगातील सर्वात मोठी Trade Deal, मोदींकडून भारत-अमेरिका व्यापारी कराराची घोषणा; ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवर फक्त 18 टक्के टॅरिफ

Last Updated:

Narendra Modi India US Trade Deal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या संवादानंतर ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवरील टॅरिफ कपातीच्या घोषणेचे स्वागत केले आहे.

advertisement
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणानंतर सोशल मीडियावर एक महत्त्वपूर्ण ट्विट करत भारत-अमेरिका संबंधांबाबत मोठा सकारात्मक संदेश दिला आहे. या ट्विटमधून पंतप्रधान मोदी यांनी ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवरील टॅरिफ 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आल्याच्या घोषणेचे स्वागत केले असून, यासाठी राष्ट्रपती ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.
News18
News18
advertisement

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “आज माझे प्रिय मित्र राष्ट्रपती ट्रम्प यांच्याशी संवाद साधून खूप आनंद झाला. ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवर आता 18 टक्के इतका कमी टॅरिफ लागू होणार असल्याचा निर्णय अतिशय आनंददायी आहे. 140 कोटी भारतीयांच्या वतीने या महत्त्वपूर्ण घोषणेसाठी राष्ट्रपती ट्रम्प यांचे मनापासून आभार.”

या वक्तव्यातून पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, या निर्णयाचा थेट फायदा भारतीय उद्योग, निर्यातदार आणि अर्थव्यवस्थेला होणार आहे.

advertisement

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, जेव्हा जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठ्या लोकशाही देश एकत्र काम करतात, तेव्हा त्याचा थेट फायदा नागरिकांना होतो. अशा सहकार्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतात. भारत-अमेरिका भागीदारी केवळ द्विपक्षीय स्तरावरच नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्था आणि स्थैर्यासाठीही महत्त्वाची ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

advertisement

याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती ट्रम्प यांच्या नेतृत्वाचेही विशेष कौतुक केले. “राष्ट्रपती ट्रम्प यांचे नेतृत्व जागतिक शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. शांततेसाठी त्यांच्या प्रयत्नांना भारत पूर्ण पाठिंबा देतो,” असे त्यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे. यामुळे युक्रेन युद्धासारख्या आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर दोन्ही देशांची भूमिका जवळ येत असल्याचे संकेत मिळतात.

आपल्या ट्विटच्या शेवटी पंतप्रधान मोदी यांनी भारत-अमेरिका भागीदारीच्या भविष्यासंदर्भात आशावाद व्यक्त केला. “भारत-अमेरिका भागीदारीला अभूतपूर्व उंचीवर नेण्यासाठी मी राष्ट्रपती ट्रम्प यांच्यासोबत जवळून काम करण्यास उत्सुक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

पंतप्रधान मोदींच्या या ट्विटमुळे भारत-अमेरिका व्यापार करार, टॅरिफ कपात आणि द्विपक्षीय संबंधांबाबतची चर्चा अधिक मजबूत झाली आहे. विशेषतः ‘मेड इन इंडिया’ उपक्रमाला आंतरराष्ट्रीय बाजारात नवी चालना मिळण्याची शक्यता असून, आगामी काळात दोन्ही देशांमधील आर्थिक, धोरणात्मक आणि राजकीय सहकार्य आणखी गती घेईल, असे संकेत या प्रतिक्रियेतून मिळत आहेत.

मराठी बातम्या/मनी/
जगातील सर्वात मोठी Trade Deal, मोदींकडून भारत-अमेरिका व्यापारी कराराची घोषणा; ‘मेड इन इंडिया’ उत्पादनांवर फक्त 18 टक्के टॅरिफ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल