भारतीय स्टेट बँक (SBI) आघाडीवर
SBI एकट्याचं लक्ष्य आहे 20,000 भरत्या करणं. यामध्ये आतापर्यंत 505 प्रोबेशनरी ऑफिसर आणि 13,455 ज्युनिअर असोसिएट्स यांची भरती पूर्ण झाली आहे.
इतर बँकांमध्येही भरती
पंजाब नॅशनल बँक (PNB) – FY26 मध्ये 5,500 पेक्षा जास्त पदं
सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 4,000 नवीन नियुक्त्या
बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, केनरा बँक – यामध्येही हजारोंच्या संख्येने भरती होणार आहे. हे सर्व बँकिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे.
advertisement
कोणत्या बँकांमध्ये होणार भरती?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI):
मार्च 2025 पर्यंत SBI मध्ये एकूण 2,36,226 कर्मचारी कार्यरत होते. ज्यापैकी 1,15,066 अधिकारी पदावर होते. अंदाजानुसार 10-15% पदं रिक्त असून ती FY26 मध्ये भरली जाणार आहेत.
पंजाब नॅशनल बँक (PNB):
PNB ने जाहीर केलं आहे की ते FY26 मध्ये 5,500 हून अधिक पदं भरतील. यामध्ये क्लर्क, अधिकारी आणि डिजिटल बँकिंगशी संबंधित पदांचा समावेश आहे.
इतर प्रमुख बँका:
-बँक ऑफ बडोदा
-युनियन बँक ऑफ इंडिया
-कॅनरा बँक
-इंडियन बँक
या सर्व बँकांमध्येही हजारोंच्या संख्येने भरती होणार आहे.
इतकी मोठी भरती का?
सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेली पदं – लाखो कर्मचारी निवृत्त झाल्याने पदं रिक्त झाली आहेत.
डिजिटल बँकिंगची गरज – UPI, ऑनलाइन बँकिंग आणि फिनटेक सेवांसाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांची आवश्यकता वाढली आहे.
ग्रामीण विस्तार – दुर्गम भागांमध्ये नवीन बँक शाखा सुरू करण्याचा सरकारचा विचार.
सरकारचा मिशन – बँकिंग व्यवस्था अधिक सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकारचा पुढाकार.
भरती प्रक्रिया कशी असेल?
सार्वजनिक क्षेत्रातील बँका सामान्यतः IBPS (इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) आणि SBI यांच्यामार्फत परीक्षा घेतात. ही प्रक्रिया खालील टप्प्यांत होईल:
ऑनलाइन अर्ज
-प्रारंभिक परीक्षा (Prelims)
-मुख्य परीक्षा (Mains)
-मुलाखत व कागदपत्र तपासणी
परीक्षा पॅटर्न:
-रीझनिंग (तार्किक विचारशक्ती)
-गणित
-सामान्य ज्ञान
-संगणक ज्ञान
-इंग्रजी भाषा
कोणते उमेदवार पात्र ठरतील?
कोणत्याही शाखेतील पदवीधर
> IT आणि डिजिटल क्षेत्रातील विद्यार्थी – डिजिटल बँकिंगमध्ये संधी
> ग्रामीण भागातील उमेदवार – स्थानिक पातळीवरही नोकरीची संधी
भरती प्रक्रिया कधीपासून सुरू होईल?
-PNB ची भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.
-SBI व इतर बँकांची भरतीची अधिसूचना ऑगस्ट-सप्टेंबर 2025 मध्ये जारी होण्याची शक्यता आहे.