TRENDING:

बाजारात खेळला गेला मोठा डाव, डी मार्टच्या मालकाने खरेदी केले 1100 कोटींचे शेअर्स; 100 वर्ष जुन्या कंपनी नेमकं गौडबंगाल काय

Last Updated:

Shares: वाढत्या व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात असताना राधाकिशन दमानी यांची रणनीती पुन्हा चर्चेत आली आहे. कर्जमुक्त आणि मजबूत डिव्हिडेंड देणाऱ्या VST Industries Ltd मधील त्यांची मोठी गुंतवणूक बाजाराचे लक्ष वेधून घेत आहे.

advertisement
मुंबई: जागतिक अनिश्चितता, वाढते व्याजदर आणि अस्थिर बाजारामुळे सध्या शेअर मार्केटमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार आता सुरक्षित, कर्जमुक्त आणि मजबूत फंडामेंटल असलेल्या कंपन्यांकडे वळताना दिसत आहेत. अशाच मार्केटमधील एका तगड्या गुंतवणुकदाराने केलेली खरेदी चर्चेत आी आहे.
News18
News18
advertisement

वाढत्या व्याजदरांच्या पार्श्वभूमीवर कंपन्यांच्या नफ्यावर दबाव वाढत असताना गुंतवणूकदार आता सुरक्षित आणि मजबूत फंडामेंटल असलेल्या कंपन्यांचा शोध घेत आहेत. अशा परिस्थितीत दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांनी पुन्हा एकदा आपल्या गुंतवणूक धोरणामुळे बाजाराचे लक्ष वेधून घेतले आहे.

त्यांनी कर्जमुक्त, स्थिर नफा देणारी आणि मजबूत डिव्हिडेंड देणारी VST Industries Ltd या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे. जी सध्याच्या बाजारात एक आकर्षक पर्याय म्हणून पुढे येत आहे.

advertisement

100 वर्षांची परंपरा आणि मजबूत वारसा

VST Industries Ltd ची स्थापना 1930 मध्ये ‘वजीर सुल्तान टोबॅको कंपनी’ या नावाने झाली होती. ही कंपनी British American Tobacco Plc ची सहयोगी आहे आणि भारतातील सिगारेट बाजारात तिसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी मानली जाते. ‘टोटल’ हा तिचा प्रमुख ब्रँड आहे.

दमानींचा दशकभराचा विश्वास

राधाकिशन दमानी यांनी मार्च 2016 पासून या कंपनीत गुंतवणूक कायम ठेवली आहे. सध्या त्यांच्या जवळ सुमारे 29% हिस्सा असून त्याची किंमत 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. यावरून त्यांच्या दीर्घकालीन (long-term) गुंतवणूक दृष्टिकोनाची झलक दिसून येते.

advertisement

कर्जमुक्त कंपनी आणि मजबूत डिव्हिडेंड

कंपनीची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची ‘झिरो डेट’ स्थिती होय. त्यामुळे व्याजदर वाढीचा तिच्यावर फारसा परिणाम होत नाही. सुमारे 21% ROCE आणि 4.5% डिव्हिडेंड यील्डमुळे ही कंपनी गुंतवणूकदारांसाठी अधिक आकर्षक ठरते. हे आकडे उद्योगाच्या सरासरीपेक्षा खूपच चांगले आहेत.

घसरण असूनही व्हॅल्युएशन आकर्षक

कंपनीचा शेअर मार्च 2021 मध्ये 302 रुपयांवर होता, जो मार्च 2026 मध्ये सुमारे 222 रुपयांपर्यंत खाली आला आहे. सध्या हा शेअर आपल्या ऑल-टाइम हायपासून सुमारे 56% नीचांकी पातळीवर ट्रेड करत आहे. 17x PE रेशोवर हा स्टॉक ऐतिहासिक आणि उद्योगाच्या सरासरीपेक्षा स्वस्त वाटत आहे.

advertisement

Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.

मराठी बातम्या/मनी/
बाजारात खेळला गेला मोठा डाव, डी मार्टच्या मालकाने खरेदी केले 1100 कोटींचे शेअर्स; 100 वर्ष जुन्या कंपनी नेमकं गौडबंगाल काय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल