ऑनलाइन तिकिटे बुक करताना पैसे कापले जाणे, पेमेंट फेल होणे किंवा जास्त वेळ घेतल्यानंतर कन्फर्म तिकिटे वेटलिस्टमध्ये येणे यासारख्या समस्यांचे मुख्य कारण म्हणजे सर्व्हरची कमी क्षमता. म्हणजेच ऑनलाइन तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या संख्येच्या तुलनेत सर्व्हरची क्षमता कमी आहे. यामुळे प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते.
रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नवीन App लाँच, कोणत्या मिळणार सुविधा?
advertisement
ही समस्या लवकरच सोडवली जाईल
आयआरसीटीसी ही समस्या सोडवण्यासाठी सर्व्हरची क्षमता वाढवण्यावर काम करत आहे. त्याची प्रोसेस सुरू झाली आहे. त्यानंतर प्रवाशांची तिकिटे ऑनलाइन लवकर बुक केली जातील. आयआरसीटीसीच्या मते, पुढील वर्षापासून तिकीट बुकिंग प्रक्रियेला वेळ लागणार नाही. क्लिक केल्यानंतर वेटिंग टाइम लागणार नाही. त्याची प्रोसेसे थेट सुरू होईल आणि काही क्षणातच तिकीट तुमच्याकडे असेल. अशाप्रकारे, सीट रिकामी दिसताच प्रोसेसे सुरू होईल.
31 हजारांहून अधिक बुकिंगची क्षमता झाली आहे
आयआरसीटीसी सर्व्हर क्षमता वाढवण्यासाठी सतत काम करत आहे. त्याचे निकालही येऊ लागले आहेत. आता प्रति मिनिट 31 हजारांहून अधिक तिकिटे ऑनलाइन बुक केली जात आहेत. पूर्वी ही क्षमता खूपच कमी होती. म्हणजेच प्रक्रियेला कमी वेळ लागत आहे. खरंतर, कन्फर्म तिकिटे उपलब्ध नसल्यामुळे सर्व्हरसह जागांची उपलब्धता देखील कमी होत आहे. रेल्वे मंत्रालय जागांची संख्या वाढवण्याच्या दिशेनेही काम करत आहे. लवकरच दरवर्षी 800 कोटींहून अधिक लोक ट्रेनने प्रवास करू शकतील.
'या' डॉक्यूमेंटनेही ऑथेंटिकेट होईल IRCTC अकाउंट! आधार अनिवार्य नाही
9 लाखांहून अधिक तिकिटे ऑनलाइन बुक केली जातात
देशभरात 3 कोटी आयआरसीटीसी यूझर्स आहेत. सध्या दररोज 9 लाखांहून अधिक तिकिटे ऑनलाइन बुक केली जात आहेत. यामध्ये प्रवाशांकडून ऑनलाइन बुकिंग तसेच एजंटद्वारे बुकिंगचा समावेश आहे. दररोज दोन कोटींहून अधिक प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. ही संख्या सतत वाढत आहे.