रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! नवीन App लाँच, कोणत्या मिळणार सुविधा?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
भारतीय रेल्वेने 'RailOne' अॅप लॉन्च केले आहे, ज्यामुळे प्रवाशांना तिकीट बुकिंग, ट्रेन ट्रॅकिंग, जेवण बुकिंग यांसारख्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळतील.
नवी दिल्ली : रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सगळ्या सुविधा एकाच App वर ठेवण्यात आल्या आहेत. IRCTC नंतर आता रेलवन App आलं आहे. या अॅपमध्ये तुम्हाला तिकीट काढण्यापासून ते टेक्नोलॉजीपर्यंत सगळ्या सुविधा एकाच app वर मिळणार आहेत. भारतीय रेल्वेनं 'RailOne' हे नवं मोबाइल App १ जुलै २०२५ रोजी लॉन्च केलं. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात या अॅपचा अधिकृत शुभारंभ केला.
वन स्टॉप सोल्यूशन
RailOne हे अॅप प्रवाशांसाठी एकाच ठिकाणी सर्व सुविधा देणारं आहे. यात आरक्षित आणि अनारक्षित तिकीट बुकिंग, पीएनआर स्टेटस तपासणी, ट्रेन लाईव्ह ट्रॅकिंग, जेवण बुकिंग, तक्रार निवारण, प्लॅटफॉर्म तिकिट, पोर्टर बुकिंग, टॅक्सी सेवा अशा अनेक गोष्टी एका क्लिकवर मिळणार आहेत. विशेष म्हणजे अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंगवर ३% सूट देखील RailOne App वापरकर्त्यांना मिळणार आहे. त्यामुळे लांबच लांब रांगेत तिकीटासाठी थांबायची गरज नाही.
advertisement
एकाच पासवर्डने सगळं Login
RailOne अॅपमध्ये 'सिंगल साइन ऑन' फीचर दिलं आहे. यामुळे पूर्वी जसं वेगवेगळ्या अॅप्ससाठी वेगळे लॉगिन करावे लागत होते, तसं आता नसेल. RailConnect किंवा UTSonMobile अॅपचा जुना User ID वापरूनच या App मध्ये लॉगिन करता येईल.
रेल्वेचा स्वतःचा e-Wallet पेमेंटही झटपट
RailOne App मध्ये 'Railway e-Wallet' सुविधा देखील आहे. यामुळे पेमेंट प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे. वापरकर्त्यांसाठी mPIN, बायोमेट्रिक लॉगिन, OTP बेस्ड Guest Login अशा विविध लॉगिन सुविधा उपलब्ध आहेत.
advertisement
नोंदणी प्रक्रिया खूपच सोपी
RailOne App वापरण्यासाठी फार मोठी माहिती द्यावी लागत नाही. केवळ मोबाइल नंबर आणि OTP वापरून Guest Login देखील करता येईल, त्यामुळे ज्यांना फक्त चौकशी करायची आहे त्यांच्यासाठीही हा पर्याय उपयुक्त आहे.
प्रवाशांचा वेळ आणि मेहनत वाचणार
या नवीन RailOne App मुळे प्रवाशांची तिकीट बुकिंगपासून ते ट्रेन ट्रॅकिंग, जेवण बुकिंगपर्यंत सगळी कामं एका अॅपवर होतील. त्यामुळे प्रवास अधिक सोयीस्कर आणि तणावमुक्त होणार आहे, असं रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 02, 2025 10:16 AM IST