देशातील बहुतांश राज्यांमध्ये रामनवमीच्या दिवशी बँकांना सुट्टी दिली जाते. वेगवेगळ्या राज्यांतील सणांनुसार या सुट्ट्या बदलत असतात. कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये आज बँकांना सुट्टी असणार जाणून घेऊया.
चैत्र महिन्यातील हा पहिला सण आहे. बुधवारी 17 एप्रिल रोजी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद राहणार आहेत. बँका जरी बंद असल्या तरी तुम्ही पैसे ट्रान्सफर करणं, ऑनलाईन छोटी मोठी बिलं भरणं अशी कामं ऑनलाइन करु शकता. आज एटीएममध्ये खडखडाट राहू शकतो.
advertisement
रामनवमीनिमित्त अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), जयपूर, कानपूर, लखनऊ, मुंबई, नागपूर, पाटणा, रांची आणि शिमला येथे बँका बंद राहतील. RBI त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://www.rbi.org.in/ वर बँकांच्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करते. सुट्ट्यांमुळे ग्राहकांना बँकेच्या शाखेत जाऊन पैसे काढता येत नाहीत. तथापि, अनेक बँकिंग सेवा सामान्यतः ऑनलाइन किंवा मोबाइल बँकिंग ॲप्सद्वारे केल्या जाऊ शकतात.