TRENDING:

5000 रुपयांची SIP तुम्हाला करेल करोडपती! FD/RD/PPF लाही विसरुन जाल!

Last Updated:

FD, RD, PPF सुरक्षित पण मर्यादित रिटर्न देतात. SIP मध्ये दर महिन्याला गुंतवणूक करून चक्रवाढ व्याजाने कोट्यधीश होण्याची संधी आहे. SIP कमी रकमेपासून सुरू करता येते आणि महागाईवर मात करण्याची क्षमता आहे.

advertisement
मुंबई : एफडी, आरडी, पीपीएफसारख्या पारंपरिक गुंतवणुकीत सुरक्षितता हमखास मिळते. पण, अशा स्कीम्समधून कोट्यधीश बनणं कठीण असतं. कारण रिटर्न मर्यादित असतो. पण, जर तुम्ही दीर्घकालीन आणि नियमित गुंतवणुकीसाठी सज्ज असाल, तर Systematic Investment Plan म्हणजेच SIP तुम्हाला झटपट श्रीमंत करू शकतं.
एफडी vs एसआयपी
एफडी vs एसआयपी
advertisement

FD आणि RD मधून फक्त सेफ भविष्य, पण SIP करेल श्रीमंत

आजच्या महागाईच्या काळात फक्त सुरक्षित गुंतवणूक पुरेशी नाही. त्यातून चांगले रिटर्न मिळणंही तितकंच गरजेचं आहे. FD, RD वर मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो आणि PPF मध्ये पैसे 15 वर्षांपेक्षा जास्त काळासाठी अडकतात. म्हणूनच SIP हा पर्याय लोकांमध्ये लोकप्रिय होतोय.

advertisement

SIP म्हणजे दर महिन्याचा स्मार्ट आणि नियमित गुंतवणूक प्लान

SIP मध्ये तुम्ही दर महिन्याला फक्त 500 किंवा 1000 रुपयांपासून सुरुवात करू शकता. ही रक्कम दर महिन्याला तुमच्या म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. जर तुम्हाला वार्षिक 12–15% पर्यंत परतावा मिळाला, तर भविष्यात कोट्यधीश होणं शक्य आहे.

SIP चे खरं बळ म्हणजे कंपाउंडिंग इंटरेस्ट आहे. उदाहरणार्थ, 100 रुपयांवर 10% रिटर्न मिळाल्यास 110 रुपये होतील. पुढच्या वर्षी त्या 110 वर 10% म्हणजे 121 रुपये होतील. ही चक्रवाढ रक्कमच तुम्हाला लाखो-कोटी रुपयांच्या दिशेने घेऊन जाते.

advertisement

Gold Reserve in Pakistan and India : खायचे वांदे असलेल्या पाकिस्तानकडे किती सोनं, भारताच्या एका मंदिरातही दुप्पट सोन्याचा साठा

समजा तुम्ही महिन्याला 5,000 रुपयांची एसआयपी करायची, त्याला तुम्हाला 15 टक्के व्याज मिळेल असं गृहित धरू याचा कालावधी 25 वर्ष पकडून चालू. म्हणजे तुम्हाला 25 वर्ष दर महिन्याला 5000 रुपये गुंतवायचे आहेत. तुमची एकूण रक्कम 15,00,000 रुपये होतील. त्यावर तुम्हाला रिटर्न 1,22,82,804 रुपये मिळू शकतात. ही सगळी रक्कम मिळून एकूण फंड 1,37,82,804 रुपये तुमच्या खात्यावर जमा होईल. SIP वर मिळणारे रिटर्न हे फिक्स नाहीत तर ते मार्केटनुसार बदलत असतात.

advertisement

का निवडावी SIP?

कमी रकमेपासून सुरुवात करता येते. वेळेवर आणि नियमित गुंतवणुकीनं फंड तयार होतो. नियमित गुंतवणुकीची चांगली सवय लागते. महागाईवर मात करण्याची क्षमता असते. गरजेनुसार वाढ/कमी करता येते. ELSS वगळता कोणताही लॉक-इन नाही त्यामुळे गरजेनुसार पैसे काढता येतात. SIP म्हणजे म्युच्युअल फंड. आणि म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजाराशी थेट जोडलेली गुंतवणूक. त्यामुळे बाजारातील घसरणीत तुमचं गुंतवलेलं मूळ भांडवलही कमी होऊ शकतं. दीर्घकालीन गुंतवणुकीत बाजाराची सरासरी वाढ तुमच्या फायद्यात जाते.

advertisement

Gold Rate: सराफा बाजारात मोठ्या घडामोडी, सोनं स्वस्त, तर चांदी महाग, काय आहेत 24 कॅरेटचे भाव?

FD, RD, PPF हे कमी जोखीम असलेले पर्याय आहेत, जे सुरक्षिततेसाठी योग्य आहेत. पण, संपत्ती निर्मितीसाठी SIP एक अधिक चांगला पर्याय ठरतो. दोन्ही प्रकारच्या गुंतवणुकीचा योग्य संतुलन ठेवणं हीच आर्थिक शहाणपणाची गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही दर महिन्याला शिस्तबद्ध गुंतवणूक केली आणि धैर्य ठेवून दीर्घकाळ (किमान 10–15 वर्षे) गुंतवणूक चालू ठेवली, तर SIP तुम्हाला सहज कोट्यधीश बनवू शकते. पण गुंतवणुकीपूर्वी पूर्ण माहिती घ्या आणि गरज असल्यास आर्थिक सल्लागारांचा सल्ला अवश्य घ्या.

मराठी बातम्या/मनी/
5000 रुपयांची SIP तुम्हाला करेल करोडपती! FD/RD/PPF लाही विसरुन जाल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल