Gold Reserve in Pakistan and India : खायचे वांदे असलेल्या पाकिस्तानकडे किती सोनं, भारताच्या एका मंदिरातही दुप्पट सोन्याचा साठा
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gold Reserve in Pakistan and India : पाकिस्तानकडे असलेल्या साठ्यापेक्षा भारतातील मंदिरांकडे अधिकडे सोनं आहे. पाकिस्तानकडे आता फार कमी सोने शिल्लक असून त्यांची परिस्थिती खूपच गंभीर आहे.
Gold Stock : दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. पाकिस्तानमध्ये महागाईचा उच्चांक गाठला जात असून सामान्य जनतेला दोन वेळचं अन्न मिळवण्यासाठी चांगलीच धडपड करावी लागत आहे. दहशतवाद्यांना पोसून जागतिक पातळीवर स्वत:च्या पायावर धोंडा मारणाऱ्या पाकिस्तानकडे सोन्याचा साठा अतिशय कमी आहे. पाकिस्तानकडे असलेल्या साठ्यापेक्षा भारतातील मंदिरांकडे अधिकडे सोनं आहे. पाकिस्तानकडे आता फार कमी सोने शिल्लक असून त्यांची परिस्थिती खूपच गंभीर आहे.
वर्ल्ड गोल्ड काउंसिलच्या एप्रिल 2025 च्या एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानकडे एकूण सोन्याचा साठा 64.6 टन इतकाच राहिला आहे. हे राखीव निधी पाकिस्तानच्या परकीय चलन साठ्याचा खूपच लहान भाग आहे. जागतिक क्रमवारीत पाकिस्तान सुमारे 43 व्या स्थानावर आहे.पाकिस्तानकडे असलेले सोने त्यांचे चलन स्थिर ठेवण्यासाठी किंवा मोठ्या आर्थिक संकटाच्या वेळी आंतरराष्ट्रीय कर्ज किंवा आर्थिक मदत भरण्यासाठी पुरेसे नाही.
advertisement
वर्ल्ड गोल्ड काउंसिल आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या आकडेवारीनुसार, मार्च 2025 पर्यंत पाकिस्तानकडे 64.75 टन सोन्याचा साठा आहे. हा आकडा जागतिक सोन्याच्या साठ्याच्या यादीत पाकिस्तानला 44 व्या स्थानावर ठेवतो, जो भारत (880 टन), चीन (2292 टन) आणि अमेरिका (8133.5 टन) सारख्या देशांपेक्षा खूपच कमी आहे.
अहवालानुसार, पाक रुपयाच्या सतत घसरणाऱ्या मूल्यामुळे चलनस्थैर्य राखण्यासाठी साठवलेले सोनं प्रभावी ठरत नाही. परकीय कर्जाचा डोंगर वाढत असून, IMF कडून आर्थिक मदत मिळवण्यासाठीही पाकिस्तानला आपल्या आर्थिक साखळीचा विश्वासार्ह अहवाल द्यावा लागतो. अशा वेळी फक्त 64 टन सोनं असणं, म्हणजे पाकिस्तानसाठी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्यासारखं असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
एखाद्या देशात सोन्याचा साठा (Gold Reserves) का महत्त्वाचा असतो?
सोन्याचा साठा म्हणजे त्या देशाच्या आर्थिक बळकटीचा एक महत्त्वाचा भाग असतो. देशाचं चलन घसरू नये आणि त्याची किंमत टिकून राहावी म्हणून सरकार किंवा केंद्रीय बँका सोने राखून ठेवतात. सोन्याचा साठा जास्त असलेल्या देशांवर आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था, गुंतवणूकदार आणि देशांचा विश्वास अधिक असतो. युद्ध, महामारी, आर्थिक मंदी, किंवा इतर राष्ट्रीय संकटांवेळी सोनं विकून किंवा गहाण ठेवून परकीय चलन मिळवता येतं. त्यामुळे आर्थिक वादळात टिकून राहण्यासाठी सोन्याचा साठा 'बफर' म्हणून काम करतो.
advertisement
अनेकदा देशांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) किंवा जागतिक बँकेकडून कर्ज घ्यावं लागतं. अशावेळी सोन्याचा साठा असणे म्हणजे देशाची आर्थिक क्षमता दाखवण्याचा एक आधार ठरतो. देशाचा सोन्याचा साठा म्हणजे त्या देशाच्या राष्ट्रीय संपत्तीचा एक भाग असतो. GDP व्यतिरिक्त, ही भौतिक संपत्ती अर्थव्यवस्थेचं बळकटीकरण करते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 09, 2025 2:22 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Reserve in Pakistan and India : खायचे वांदे असलेल्या पाकिस्तानकडे किती सोनं, भारताच्या एका मंदिरातही दुप्पट सोन्याचा साठा