TRENDING:

'AI' च्या मदतीने भारत काय करू शकतो, हे पाहून जगालाही हेवा वाटेल' - मुकेश अंबानी

Last Updated:

'मोठ्या इंटेलिजन्स मार्केटमध्ये भारताचाही समावेश असेल. भारतात युवाशक्ती आहे. ती याला प्रोत्साहन देईल आणि देशांतर्गत बाजारातही तसंच होईल.'

advertisement
मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने भारत काय करू शकतो, हे येत्या काही वर्षांत दाखवून जगाला आश्चर्यचकित करण्यास देश तयार आहे, असे उद्गार रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी गुरुवारी काढले. मुंबईत झालेल्या 'एआय समिट इंडिया'मध्ये एन्व्हिडियाचे सीईओ जेन्सेन ह्युएंग यांच्याशी बोलताना अंबानी म्हणाले, की 'मोठ्या इंटेलिजन्स मार्केटमध्ये भारताचाही समावेश असेल. भारतात युवाशक्ती आहे. ती याला प्रोत्साहन देईल आणि देशांतर्गत बाजारातही तसंच होईल.'
(रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी)
(रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी)
advertisement

भारतीय तरुणांसमोर बोलताना अंबानी म्हणाले, की भारत हा महत्त्वाकांक्षी देश आहे. 'आपल्या देशाचं सरासरी वय 35 वर्षांच्या खाली आहे. केवळ नवीन तंत्रज्ञान नव्हे, तर महत्त्वाकांक्षाही आपल्या अर्थव्यवस्थेला चालना देतात. भारतीयांकडे रॉ टॅलेंट आहे. भारतात वेगाने वाढणारे उद्योग आहेत. आपण अंतराळ संशोधन करतो, चिप्स तयार करतो.' देशाच्या याच बळावर देशात इंटेलिजन्स मार्केटला प्रोत्साहन मिळेल.'

advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा द्रष्टा नेता लाभणं हे भारताचं सुदैव आहे, असंही अंबानी म्हणाले. 'आपल्या पंतप्रधानांनी म्हटल्याप्रमाणे हा नवा महत्त्वाकांक्षी भारत आहे. भारताचं प्रीमिअर डिजिटल सोसायटी म्हणून रूपांतर करण्यात त्यांच्या नेतृत्वाचा महत्त्वाचा भाग आहे,' असंही अंबानींनी नमूद केलं.

जिओने सर्व भारतीयांना डेटा कसा अ‍ॅक्सेसिबल आणि परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून दिला आणि एआय परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी हेच पुन्हा करणं कसं गरजेचं आहे, हे अंबानींनी भारताची एआय व्हिजन याबद्दल ह्युएंग यांच्याशी बोलताना सांगितलं.

advertisement

'अमेरिका आणि चीन वगळता आज भारतात बेस्ट डिजिटल कनेक्टिव्हिटी इन्फ्रास्ट्रक्चर आहे. जिओने भारताला आठ वर्षांत 158व्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर नेलं आहे. आमची कंपनी जगातली सर्वांत मोठी डेटा कंपनी आहे. या वर्षी जिओ कंपनीने 16 हेक्साबाइट्स डेटा डिलिव्हर केला. अमेरिकेत एक जीबी डेटासाठी सरासरी पाच डॉलर्स रुपये खर्च येतो. प्रति जीबी जागतिक सरासरी दर 3.5 डॉलर्स आहे. भारतात जिओ कंपनी प्रत्येक जीबी डेटा 15 सेंट्समध्ये उपलब्ध करून देते. सर्वसामान्यांना इंटेलिजन्स परवडणाऱ्या दरात उपलब्ध होण्यासाठी आपल्याला जिओ फॉर्म्युला पुन्हा अमलात आणावा लागणार आहे,' असं अंबानी म्हणाले.

advertisement

Llama open source हा पर्याय आणून एआय तंत्रज्ञान अधिक अ‍ॅक्सेसिबल करण्याबद्दल मुकेश अंबानी यांनी मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांचंही कौतुक केलं. याची इतिहासात नोंद होईल, असंही ते म्हणाले.

एआयमध्ये रिलायन्स-एन्व्हिडिया भागीदारी

भारतात एआय इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एन्व्हिडिया भागीदारी करत आहेत, असं जेन्से ह्युएंग यांनी सांगितलं. 'मोठी लोकसंख्या असणं आणि कम्प्युटर्स इंजिनीअर्स मोठ्या संख्येने असणं ही भारतासाठी अत्यंत मोठी संधी आहे. सध्याचा काळ असामान्य आहे. यासाठी भागीदारी करणं हा मी माझा सन्मान समजतो,' असं ह्युएंग अंबानी यांना म्हणाले.

advertisement

या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतात गेल्या वर्षाच्या तुलनते वीस पट अधिक कम्प्युट कपॅसिटीज असतील, असं ह्युएंग म्हणाले.

अंबानी म्हणाले, 'जिओने टेलिकॉम क्षेत्रात जे केलं, तसं चांगल्या दर्जाचं एआय इन्फ्रास्ट्रक्चर एन्व्हिडियाकडून उपलब्ध होईल. आम्ही या भागीदारीच्या दृष्टीने पुढे पाहत आहोत.'

मराठी बातम्या/मनी/
'AI' च्या मदतीने भारत काय करू शकतो, हे पाहून जगालाही हेवा वाटेल' - मुकेश अंबानी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल