TRENDING:

Success Story : डिलिव्हरी बॉयची नोकरी सोडली, सुरू केलं फूड आउटलेट, महिन्याला आता 2 लाख कमाई

Last Updated:

रोहनने डिलिव्हरी बॉय म्हणून काम केले, तर श्वेताने विविध छोटी-मोठी कामे करून दिवस-रात्र मेहनत घेतली. पण या नोकऱ्या त्रासदायक असल्यामुळे दोघांनी 2019 मध्ये नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

advertisement
मुंबई : अनेक जण व्यवसाय करण्याला प्रधान्य देत आहेत. दिव्यामधील रोहन प्रभुलकर आणि श्वेता प्रभुलकर या दाम्पत्याने कठीण परिस्थितीतून मार्ग काढत स्वतःचे यशस्वी व्यावसायिक स्थान निर्माण केले आहे. दोघांनीही फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले होते, पण त्या क्षेत्रातून स्थिर उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. रोहनने डिलिव्हरी बॉय म्हणून काम केले, तर श्वेताने विविध छोटी-मोठी कामे करून दिवस-रात्र मेहनत घेतली. पण या नोकऱ्या त्रासदायक असल्यामुळे दोघांनी 2019 मध्ये नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
advertisement

लालबाग–परळ परिसरात त्यांनी तीन-चार व्यवसाय सुरू केले. पण काही अनपेक्षित कारणांमुळे ते टिकू शकले नाहीत. तरीही दोघांनी हार न मानता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. या सगळ्या काळात घरच्यांनी त्यांना पूर्ण साथ दिली. यानंतर ते दिव्यामध्ये राहायला आले. व्यवसाय सुरू करण्याइतके भांडवल नसल्याने त्यांनी घरातूनच फास्ट फूड विकण्यास सुरुवात केली. उत्तम चव, स्वच्छता आणि ग्राहकांशी प्रेमळ व्यवहारामुळे याला काही महिन्यांतच मोठा प्रतिसाद मिळू लागला. त्यानंतर त्यांनी श्वेरोहस नावाने स्वतःचे फूड आउटलेट सुरू केले आणि तेही झपाट्याने लोकप्रिय झाले.

advertisement

Winetr Health Tips : हिवाळ्यात भरपूर खा ज्वारी आणि बाजरीची भाकरी! तज्ज्ञांनी सांगितले जबरदस्त फायदे

सोबतच त्यांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. महिन्याला दोन लाख रुपये कमवायचे चॅलेंज घेत त्यांनी इंस्टाग्रामवर नियमित रील्स पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि वाशी, ठाणे, डोंबिवलीसारख्या दूरच्या भागांतूनही ग्राहक त्यांच्या दुकानात येऊ लागले. आज रोहन आणि श्वेता त्यांच्या श्वेरोहस आउटलेटमधून महिन्याला दीड ते दोन लाख रुपये कमावत आहेत.

advertisement

श्वेता आणि रोहन सांगतात की, बिझनेस खूप कठीण असतो. पण जिद्द आणि सातत्य सोडले नाही तर माणूस नक्कीच यशस्वी होतो.

त्यांची ही जिद्द, मेहनत आणि हार न मानण्याची वृत्ती अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

मराठी बातम्या/मनी/
Success Story : डिलिव्हरी बॉयची नोकरी सोडली, सुरू केलं फूड आउटलेट, महिन्याला आता 2 लाख कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल