संतोष कानगुलकर हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील पण नोकरीनिमित्त ते छत्रपती संभाजीनगरमध्ये आले. सुरुवातीला त्यांनी एका हॉटेलवरती भांडे घासण्यापासून सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हॉटेल वरती काम करत करत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा एक डिप्लोमा पूर्ण केला आणि एका खाजगी हॉटेलमध्ये शेफ म्हणून कामाला लागले. त्या ठिकाणी ते नोकरी करत होते पण त्यानंतर लॉकडाऊन आलं, म्हणजे कोरोनाचा काळ आला. कोरोना आल्यामुळे सर्वांच्याच नोकरीला धोका आला होता. त्यामुळे ते ज्या ठिकाणी काम करायचे, तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करा जोपर्यंत हा काळ जात नाही तोपर्यंत. म्हणून त्यांनी मसाल्याचा व्यवसाय करायचा ठरवलं.
advertisement
अस्सल शिक कढई, सोलापुरात अशी चवं कुठेच नाही, एकदा खाल तर पुन्हा याल
त्यांची आई आधीपासूनच घरगुती मसाले करायची. त्यामुळे त्यांना वाटलं की आपण मसाल्याचा व्यवसाय करूया. सुरुवातीला त्यांनी एकदम कमी भांडवलामध्ये मसाला व्यवसायाची सुरुवात केली. शेफ मसाले नावाने त्यांनी त्यांचा मसाल्यांचा ब्रँड सुरू केला. त्यानंतर जशी मागणी आली तसे तसे लोकांना मसाले आवडायला लागले, त्यानंतर त्यांनी व्यवसाय वाढवला.
आज त्यांच्याकडे 20 ते 25 प्रकारचे मसाले मिळतात. त्यामध्ये तुम्हाला रेडी टू कुक मसाला देखील मिळतो. विशेष म्हणजे हे जे सर्व मसाले आहेत ते जात्यावरती बनवले जातात. कुठल्याही मशीनचा किंवा गिरणीचा वापर ते अजिबात करत नाहीत. यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रिझर्वेटिव्ह हे वापरले जात नाही. त्यांच्या मसाल्याला संपूर्ण ठिकाणाहून मोठी मागणी असते. त्यासोबतच ॲमेझॉन वरती देखील त्यांचे मसाले विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
हा व्यवसाय करत असताना त्यांना अनेक अडचणी आल्या. कधी पैशाची अडचण आली किंवा कधी इतरही अडचणी आल्या, पण तरी त्यांनी त्यांच्या या व्यवसायामध्ये सातत्य ठेवले. आज महिन्याला 1 लाखांची कमाई त्यांची होते.