TRENDING:

1 एप्रिलपासून नवा नियम, सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी बदलणार नियम, आताच वाचा नाहीतर होईल नुकसान

Last Updated:

SEBI ने 1 एप्रिल 2026 पासून सोन्या चांदीच्या म्युच्युअल फंडसाठी भारतीय स्पॉट प्राईस अनिवार्य केला. Motilal Oswal रिपोर्टनुसार सोन्याच्या किमतीत मोठी वाढ अपेक्षित.

advertisement
मागच्या काही महिन्यांमध्ये सोन्या चांदीच्या दरांनी जो नफा दिला आहे तो अफाट आहे. शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड्स पेक्षाही सोन्या चांदीच्या दरातील गुंतवणूक मोलाची आणि फायद्याची ठरली.
News18
News18
advertisement

लोक दागिने घेण्याऐवजी SIP किंवा डिजिटल गोल्ड करत आहेत. तुम्हीही असं काही करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. त्याचं कारण म्हणजे आता सोन्या चांदीचे म्युच्युअल फंड किंवा ETF किंवा डिजिटल गोल्ड घेणाऱ्यांसाठी आता नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.

1 एप्रिल 2026 पासून सोन्या चांदीचे म्युच्युअल फंड, SIP केलेल्यांसाठी हे नवीन नियम सेबी लागू करणार आहे. मार्केट रेग्युलेटर SEBI ने सोन्या-चांदीचे दर ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल केला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, आता तुमच्या सोन्याची किंमत आता भारतीय बाजाराप्रमाणे ठरणार आहे.

advertisement

आत्तापर्यंत तुम्ही घेतलेल्या गोल्ड किंवा सिल्वर ईटीएफची किंमत ही लंडन बुलियन मार्केटच्या दरावरून ठरवली जायची. त्यात टॅक्स, ट्रान्सपोर्ट आणि रुपयाचं मूल्य असं गणित करून भारतीय किंमत काढली जात असे.

१ एप्रिल २०२६ पासून सर्व म्यूचुअल फंड्सनी भारतीय स्टॉक एक्सचेंजवरील डोमेस्टिक स्पॉट प्राईस वापरावा अशा सूचना दिल्या आहेत. यामुळे तुमच्या गुंतवणुकीची किंमत भारतीय बाजाराच्या स्थितीनुसार जास्त अचूक आणि पारदर्शक असेल. यामुळे आंतरराष्ट्रीय आणि भारतीय किमतींमधील जो थोडाफार फरक असायचा, तो आता दूर होईल.

advertisement

नियम बदलला असतानाच दुसरीकडे सोन्याच्या किमतीबाबत मोठी बातमी समोर येतेय. प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांच्या रिपोर्टनुसार, सोन्यामध्ये आता लाँग टर्म इनवेस्टमेंट करणाऱ्यांची संख्या वाढेल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पूर्वी प्रॉफिट बुकिंग करून पैसे काढून घेतले जात होते. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान होत होतं. या सगळ्यावर आळा घालण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत.

advertisement

तज्ज्ञांच्या मते, येत्या १२ महिन्यांत देशांतर्गत बाजारात सोन्याचे भाव १.८५ लाख रुपये प्रति १० ग्रॅम पर्यंत पोहोचू शकतात. जागतिक बाजारात सोन्याने आधीच ५,००० डॉलरचा टप्पा ओलांडला असून, परिस्थिती अशीच राहिली तर हे भाव ७,५०० डॉलरपर्यंतही जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जगभरात सुरू असलेले युद्धजन्य प्रसंग आणि वाढतं कर्ज यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहत आहेत. जगातील मध्यवर्ती बँका दरवर्षी जवळपास १,००० टन सोन्याची खरेदी करत आहेत. भारतात लग्नसराईमुळे सोन्याची मागणी नेहमीच तेजीत असते, याचाही फायदा किमतींना मिळत आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/
1 एप्रिलपासून नवा नियम, सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी बदलणार नियम, आताच वाचा नाहीतर होईल नुकसान
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल