मुंबई: सेबीने (SEBI) म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. आता म्युच्युअल फंड युनिट्स गिफ्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचा अर्थ असा की तुम्ही आपल्या कुटुंबीयांना, मुलांना, मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तींना असे गिफ्ट देऊ शकता ज्यांची किंमत काळानुसार वाढत जाते.
advertisement
Trustedarms Finserv च्या मते हा निर्णय कुटुंबासाठी, मुलांच्या भविष्यासाठी आणि मित्रांसाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेचे कवच तयार करण्याची मोठी संधी आहे. आता पाहूया, म्युच्युअल फंड कसे गिफ्ट करता येतात, कोणाला देता येतात आणि त्यावरील कराचे नियम काय आहेत.
कोण म्युच्युअल फंड गिफ्ट करू शकतो?
ज्या व्यक्तीकडे KYC पूर्ण केलेला आणि वैध म्युच्युअल फंड फोलिओ आहे, ती व्यक्ती आपल्या...
कुटुंबीयांना
मित्रांना
मुलांना (पालकांच्या माध्यमातून)
किंवा कोणत्याही इतर MF गुंतवणूकदाराला
म्युच्युअल फंड गिफ्ट करू शकते. तसेच एखाद्या व्यक्तीला कोणाकडूनही MF युनिट्स गिफ्ट म्हणून मिळू शकतात.
गिफ्ट Transfer प्रक्रिया
म्युच्युअल फंड युनिट्स गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीच्या फोलियोमधून थेट गिफ्ट मिळणाऱ्या व्यक्तीच्या फोलियोमध्ये ट्रान्सफर होतात. हे ट्रान्सफर CAMS किंवा KFintech पोर्टलद्वारे केले जाते. ट्रान्सफरसाठी युनिट मिळणाऱ्याने सहमती देणे आवश्यक आहे.
युनिटची खरेदीची सुरुवातीची किंमत (Cost of acquisition) आणि होल्डिंग पीरियड (Holding period) देखील गिफ्टसोबतच ट्रान्सफर होतात. यामुळे भविष्यात टॅक्स कसा लागू होईल, हेही याच प्रारंभिक डेटावर अवलंबून असेल.
टॅक्सचे नियम काय सांगतात?
गिफ्ट देणाऱ्या व्यक्तीवर कोणताही टॅक्स लागत नाही.
गिफ्ट मिळणाऱ्यासाठी टॅक्सची स्थिती वेगळी असू शकते.
1) कुटुंबातील व्यक्तीकडून गिफ्ट मिळाल्यास:
-कोणताही टॅक्स लागू होत नाही.
2) इतर कोणाकडून गिफ्ट मिळाल्यास:
-जर वर्षभरातील गिफ्ट्सची एकूण किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यावर प्राप्तीकर (Income Tax) लागू होऊ शकतो.
3) युनिट्स रिडीम केल्यावर:
गिफ्ट मिळालेल्या व्यक्तीला कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल. हा टॅक्स मूळ युनिट होल्डिंग कालावधी आणि किमतीच्या आधारे लागतो.
