TRENDING:

2 दिवसांत गुंतवणुकदारांचे झाले हाल! IT स्टॉक्समुळे आज 'ब्लॅक फ्रायडे'

Last Updated:

ग्लोबल मार्केटमध्ये झालेल्या भयावह विक्रीचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. मार्केटचे प्रमुख सूचकांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. दोन्ही इंडेक्स घसरणीसह ओपन झाले.

advertisement
नवी दिल्ली : ग्लोबल मार्केटमध्ये भयावह विक्री पाहायला मिळाली. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही पाहायला मिळाला आहे. मार्केटचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घट पाहायला मिळाली आहे. दोन्हीही इंडेक्स घसरणीसह ओपन झाले.सकाळी दहापर्यंत सेन्सेक्स जवळपास 700 अंकांनी पडून ट्रेड करत आहे. तर निफ्टीमध्येही जवळपास 1 टक्केची घसरण आली आहे. आयटी सेक्टरच्या शेअरमध्ये ग्लोबली घसरण आली आहे.
स्टॉक मार्केट क्रॅश
स्टॉक मार्केट क्रॅश
advertisement

इंडियन मार्केटमध्येही हे शेअर्स जवळपास 5% खाली आले आहेत. ज्यामुळे संपूर्ण बाजार हादरला आहे. गेल्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांनी जवळपास 10 लाख कोटी रुपयांचे नुकसान केले आहे. गेल्या बुधवारी, जेव्हा शेअर बाजार सकारात्मक बंद झाला तेव्हा बीएसईचे मार्केट कॅप 474 लाख कोटी रुपये होते, जे आता 465 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे.

advertisement

सेन्सेक्स निफ्टी आपटले! सोन्या-चांदीचाही यू-टर्न, AI मुळे भारतासह USच्या मार्केटमध्ये धुमाकूळ

गुरुवारी सर्व सेक्टरमध्ये प्रॉफिट बुकिंग आणि IT स्टॉक्समध्ये विक्री दरम्यान भारतीय स्टॉक मार्केट घसरणीसह बंद झाला होता. सेंसेक्स 558.72 पॉइंट्स किंवा 0.66% ने पडून 83,674.92 वर बंद झाला. तर निफ्टी 50146.65 पॉइंट्स किंवा 0.57% ने घसरुन 25,807.20 वर बंद झाली होती. तर आज सेन्सेक्स जवळपास 700 अंकांच्या घसरणीसह ओपन झाला.

advertisement

बाजार इतका का घसरला?

मिंटच्या एका रिपोर्टमध्ये, जिओजित इन्व्हेस्टमेंट्सचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही.के. विजयकुमार म्हणाले की, बाजार अस्थिर अवस्थेत प्रवेश केला आहे. ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये काही प्रमाणात घबराट निर्माण होण्याची शक्यता आहे, संधी असल्या तरी. अमेरिकन बाजारात एआय स्टॉकमध्ये विक्री अपेक्षित होती, परंतु त्याची वेळ आणि व्याप्ती अज्ञात होती. नॅस्डॅकमधील 2.04% घसरण ही क्रॅश नाही, परंतु जर घसरण सुरूच राहिली तर ती अमेरिकन स्टॉक मार्केटला आणखी खाली खेचू शकते.

advertisement

8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय

आज भारतीय स्टॉक मार्केटमध्ये कोणत्या गोष्टींमुळे धुमाकूळ दिसतोय. यावर जियोजित इन्वहेस्टमेंट एक्सपर्ट म्हणाले की, भारतीय मार्केटमध्ये अजुनही IT स्टॉक्समधील मोठ्या विक्रीमुळे हालचाल दिसत आहे. हे इंडिया इंक.च्या दुसऱ्या क्रमांकाच्या नफ्याचे प्रतिनिधित्व करते. एंथ्रोपिक शॉकचा आयटी क्षेत्रावर होणारा खरा परिणाम अद्याप कळलेला नाही. आयटी स्टॉक्समध्ये पॅनिक सेलिंग होणे या टप्प्यावर चांगली कल्पना असू शकत नाही. गुंतवणूकदारांना परिस्थिती शांत होण्याची वाट पहावी लागेल.

advertisement

जियो पॉलिटिकल टेन्शन 

मिडिल ईस्टमधील वाढत्या तणावाने मार्केटला अडचणीत आणले आहे. कारण यूएस प्रेसिटेंड डोनाल्ड ट्रंप यांनी इशारा दिला आहे की, डिप्लोमॅटिक चर्चा जारी राहूनही न्यूक्लियर अॅग्रीमेटं झाला नाही तर ईरानच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते. अनिश्चिततेत भर घालत ट्रम्प म्हणाले की वॉशिंग्टन आणि तेहरान पुन्हा चर्चा सुरू करण्याच्या तयारीत असताना ते या प्रदेशात दुसरे विमानवाहू जहाज तैनात करण्याचा विचार करत आहेत.

डॉलरमध्ये घसरण 

सलग तिसऱ्या सत्रात वाढून 96.93 वर पोहोचलेला अमेरिकन डॉलर आणि कमकुवत होत चाललेला रुपया, जो पूर्वीच्या 90.59 वरून 0.1% ने घसरून 90.67 वर पोहोचला, हे सामान्यतः इक्विटीसाठी नकारात्मक आहेत कारण त्यामुळे भारतासारख्या उदयोन्मुख बाजारपेठांमधून अमेरिकेतील सुरक्षित मालमत्तेकडे परकीय निधीचा ओघ वाढू शकतो.

मराठी बातम्या/मनी/
2 दिवसांत गुंतवणुकदारांचे झाले हाल! IT स्टॉक्समुळे आज 'ब्लॅक फ्रायडे'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल