ट्रेडिंग सत्राच्या शेवटी, सेन्सेक्स ७६.५४ अंकांनी किंवा ०.०९ टक्क्यांनी वाढून ८०,७८७.३० वर बंद झाला आणि निफ्टी ३२.१५ अंकांनी किंवा ०.१३ टक्क्यांनी वाढून २४,७७३.१५ वर बंद झाला. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी ०.५ टक्क्यांनी वाढलं.
या शेअरमध्ये वाढ
टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, आयशर मोटर्स, एम अँड एम आणि बजाज ऑटो हे आज निफ्टीवरील टॉप वियरर्समध्ये होते. निफ्टीमध्ये ट्रेंट, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एशियन पेंट्स, टीसीएस, टेक महिंद्रा हे सर्वाधिक घसरणीचे शेअर्स होते.
advertisement
GST चा शेअर मार्केटवर इम्पॅक्ट
दरम्यान, जीएसटी दरांमध्ये अलिकडेच कपात करण्यात आल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावना सुधारल्या आहेत. "२२ सप्टेंबरनंतर, जेव्हा नवीन जीएसटी दर लागू केले जातील, तेव्हा मागणीत मोठी वाढ होईल, विशेषतः ऑटोमोबाईल्स आणि ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी" असं जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक स्ट्रेटेजिस्ट व्हीके विजयकुमार म्हणाले.
अमेरिकेतील कमकुवत कामगार आकडेवारीमुळे या महिन्याच्या अखेरीस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा आणखी वाढली आहे. मेहता इक्विटीज लिमिटेडचे प्रशांत तपसे म्हणतात की १७ सप्टेंबरच्या बैठकीत फेडकडून व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात होण्याची अपेक्षा आहे.
२४,०७५ पर्यंत घसरण्याची शक्यता
दरम्यान, शुक्रवारी २० दिवसांच्या एसएमएच्या वर बंद होणे हे बाजाराच्या वाढीसाठी पुरेशा जोखीम क्षमतेचे लक्षण आहे. २४,८७० च्या वर गेल्याने निफ्टीचा २५,४०० पर्यंतचा मार्ग मोकळा होऊ शकतो. दुसरीकडे, जर तो २४७०० च्या वर राहिला नाही तर तो २४५०० च्या खाली येऊन २४,०७५ पर्यंत घसरण्याची शक्यता आहे, असं जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे आनंद जेम्स यांचा दावा आहे.
शिवाय, गुंतवणूकदार भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या महागाईच्या आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेवतील. यावरून अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या चलनविषयक धोरणाबद्दल संकेत मिळतील. गेल्या बैठकीत फेडचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी २५ बेसिस पॉइंट कपातीचे संकेत दिले होते. दरम्यान, अपेक्षेपेक्षा कमकुवत असलेल्या अमेरिकन रोजगार आकडेवारीमुळे पुढील आठवड्यात फेड बैठकीत कपात होण्याची अपेक्षा आणखी बळकट झाली आहे.
तांत्रिक दृष्टिकोनातून, निर्देशांकात निर्णायक कल दिसून येत नाही. प्रत्येक सत्रात चढ-उतारांचा काळ दिसून येत आहे. सॅमको सिक्युरिटीजचे धुपेश धामेजा म्हणतात की, निफ्टी आता २४,५००-२५,००० च्या मोठ्या एकत्रीकरण श्रेणीमध्ये अडकला आहे. ही श्रेणी ओलांडल्यानंतरच बाजारात नवीन तेजी दिसून येईल. २४,९०० च्या वर एक मजबूत हालचाल शॉर्ट कव्हरिंगला चालना देऊ शकते, ज्यामुळे दीर्घ तेजीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. २४,५०० च्या खाली घसरण झाल्यास मंदीचा एक नवीन टप्पा सुरू होऊ शकतो. तोपर्यंत, बाजारात रेंज-बाउंड अॅक्शन सुरू राहण्याची शक्यता आहे. या रेंजची खालची मर्यादा २४,४०० आणि वरची मर्यादा २४,९०० असू शकते.
Disclaimer: (इथं दिलेली माहिती तज्ज्ञ आणि एक्सपर्टशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे जोखिमेचं आहे. विशेषतः F&O सेगमेंटमध्ये ट्रेडिंग खूप जोखिमयुक्त असते. यामुळे इन्व्हेस्टमेंटपूर्वी एखाद्या सर्टिफाइड आर्थिक सल्लागाराचा सल्ला अवश्य घ्या. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)