या कंपनीचा शेअर 2011 पासून तीन रुपयांच्या आसपास होता. एशियन पेंट्समधील त्याच्या स्टेकनुसार या शेअर्सचे मूल्य 5.85 लाख रुपये असल्याचं मानलं जात होतं. पण, ही त्याची योग्य किंमत नव्हती. कंपनीच्या भागधारकांना तो कमी किमतीत विकायचा नव्हता. त्यामुळे सेबीने कंपनीला स्पेशन कॉल ऑक्शनद्वारे शेअर्सचं खरं मूल्य शोधण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 29 ऑक्टोबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजने (बीएसई) होल्डिंग कंपन्यांच्या किंमतीबाबत स्पेशल कॉल ऑक्शन आयोजित केला होता. या लिलाव सत्रात एल्सिडच्या शेअरची किंमत 2.25 लाख रुपये निश्चित करण्यात आली. एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेडचे शेअर्स 29 ऑक्टोबर रोजी बीएसईवर पुन्हा लिस्ट झाले.
advertisement
शेअरची लिस्टिंग किंमत 2.25 लाख रुपये होती. पण, या स्मॉलकॅप स्टॉकने दलाल स्ट्रीटवर इतिहास रचत तो 2,36,250 रुपयांवर पोहचला. शेअरच्या किमतीत 66,92,535 टक्क्यांनी वाढ झाली. या वर्षी 21 जून रोजी हा शेअर फक्त 3.51 रुपयांचा पेनी स्टॉक होता. तेव्हापासून त्याचं ट्रेडिंग बंद झालं होतं. री-लिस्टिंगनंतर हा शेअर गेल्या चार दिवसांपासून सतत अप्पर सर्किटमध्ये आहे.
एल्सिड इन्व्हेस्टमेंट ही आरबीआयकडे 'गुंतवणूक कंपनी श्रेणी' अंतर्गत नोंदणी असलेली एनबीएफसी आहे. कंपनीचा सध्या स्वतःचा कोणताही ऑपरेटिंग व्यवसाय नाही. पण, एशियन पेंट्ससारख्या इतर मोठ्या कंपन्यांमध्ये एल्सिडची मोठी गुंतवणूक आहे. या कंपनीचं मार्केट कॅपिटस 6,030.43 कोटी रुपये आहे.
