एका व्यक्तीला घरात ३० वर्ष जुनं रिलायन्स शेअर सर्टिफिकेट सापडलं. त्यावरची किंमत पाहून तर चक्क अवाक व्हाल. 30 वर्षांपूर्वी या शेअरची किंमत साधारण 10 रुपये असल्याचं या सर्टिफेटवर दिसत आहे. असे त्याच्याकडे 30 शेअर्स असल्याचं त्याने सांगितलं. आता या शेअर्सचं करायचं काय? ते कसे खात्यावर घ्यायचे किंवा विकायचे असा प्रश्न त्याला पडला आहे. एका व्यक्तीला अचानक आपल्या घरात एक जुना दस्तऐवज सापडला. त्याला समजलेच नाही की हा कागदपत्रांचा गठ्ठा नक्की काय आहे! त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर तो पेपर शेअर केला आणि तज्ज्ञांकडून मदत मागितली. शेवटी हा दस्तऐवज नक्की कशाचा असू शकतो?
advertisement
30 वर्षांपूर्वी घेतलेले शेअर्स, आज झाले लाखोंमध्ये!
Rattan Dhillon नावाच्या व्यक्तीने X वर दोन जुने दस्तऐवज शेअर केले आणि लिहिले, "आम्हाला हे पेपर्स घरात सापडले आहेत, पण मला शेअर बाजाराची अजिबात माहिती नाही. कोणी तज्ज्ञ मला सांगेल का की हे शेअर्स अजूनही आमच्या नावावर आहेत का?"
त्याच्या पोस्टनंतर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. त्याने जे कागदपत्र शेअर केले होते, त्यावरून असे दिसत होते की त्याच्या कुटुंबाने 1987 ते 1992 च्या दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे 30 शेअर्स खरेदी केले होते – 1987 मध्ये 20 शेअर्स आणि 1992 मध्ये 10 शेअर्स. त्यावेळी प्रत्येक शेअरची किंमत फक्त 10 रुपये होती.
शेअर बाजारातील वाढ आणि आता मिळणारा मोठा नफा
त्या काळात डिजिटल शेअर्सचा वापर होत नव्हता. त्यामुळे शेअर्स खरेदी केल्यावर फिजिकल स्वरूपात प्रमाणपत्र दिले जात असे. आता प्रश्न असा होता की या शेअर्सची आजच्या तारखेला किती किंमत असेल?
एका तज्ज्ञाने कमेंट करत माहिती दिली की, गेल्या 30 वर्षांत RIL ने 3 वेळा शेअर स्प्लिट आणि 2 वेळा बोनस दिला आहे. त्यामुळे रतनच्या कुटुंबाकडे आता 30 शेअर्सऐवजी जवळपास 960 शेअर्स असावेत. सध्याच्या RIL शेअरच्या किमतीनुसार त्यांची एकूण किंमत अंदाजे 11.88 लाख रुपये होते!
300 रुपयांची गुंतवणूक, 11.88 लाख रुपयांचा फायदा!
याचा अर्थ असा की 30 वर्षांपूर्वी Rattan Dhillon च्या कुटुंबाने अवघ्या 300 रुपयांमध्ये घेतलेले शेअर्स आता 11.88 लाख रुपये झाले आहेत! अशा घटना अनेक वेळा समोर येतात, जिथे एखाद्याच्या आजोबांनी किंवा वडिलांनी फिजिकल फॉर्ममध्ये शेअर्स खरेदी केलेले असतात, पण पुढच्या पिढीला त्याची कल्पनाही नसते. आणि मग कधीतरी घर साफ करताना हे जुने पेपर्स हाती लागतात आणि लोक अचानक लखपती-करोडपती होतात!
शेअर्स डिजिटल स्वरूपात ट्रान्सफर कसे करावे?
यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ही गुंतवणूक कॅश करू इच्छित असाल तर आधी ती डिजिटल फॉर्ममध्ये ट्रान्सफर करावी लागेल. त्यासाठी: ज्या व्यक्तीच्या नावावर शेअर्स आहेत, त्यांचे ओळखपत्र आणि कागदपत्रे जमा करावी लागतील. परिवारातील वारसदारांना आवश्यक कागदपत्रे सबमिट करावी लागतील. हे शेअर्स ‘Demat Account’ मध्ये ट्रान्सफर केल्यानंतर ते विकून त्याचा पैसा मिळवता येईल. या पोस्टवर लोकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. एकाने कमेंट केली, "तुमची लॉटरी लागली, तुम्ही एका रात्रीत लखपती झालात!" तर दुसऱ्याने लिहिले, "भाऊ, अजून नीट घर तपासा, MRF चे शेअर्सही निघाले तर थेट करोडपती व्हाल!"
गुंतवणुकीत मोठी संधी!
या घटनेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो – गुंतवणूक दीर्घकालीन केली तर ती नक्कीच मोठा नफा देते. आज डिजिटल युगात शेअर्स खरेदी करणे सोपे झाले आहे, पण जुनी गुंतवणूक हीसुद्धा भविष्यात आश्चर्यकारक रिटर्न्स देऊ शकते. म्हणूनच, जुने कागद वाया घालवण्याआधी एकदा तपासा, कदाचित तुम्हीही कुठेना कुठे करोडोंचे मालक असाल!