सीएनआय रिसर्च या कंपनीच्या शेअरने सध्याच्या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 3.16 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 16 लाख रुपयांचा नफा नोंदवला होता. विक्रीमध्ये मोठी घसरण झाली होती. 2023 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या 256 लाख रुपयांवरून घटून 33 लाख रुपयांवर आली. ही कंपनी रिसर्च फर्म म्हणून काम करते. परदेशी इक्विटी रिसर्च कंपनीसह पार्टनरशिपअंतर्गत इन्व्हेस्टर्सना मूल्यवर्धित कंटेंट देण्याचं काम ही कंपनी करते. कंपनीच्या प्रमुख कंटेंटमध्ये ब्रेकिंग न्यूज, स्पेशल फीचर्स, स्ट्रीट कॉल, इनसाइट्स, रिसर्च रिपोर्ट आणि न्यूजलेटरसह अनेक प्रॉडक्ट्सचा समावेश आहे.
advertisement
सद्यस्थिती
गेल्या पाच दिवसांमध्ये या कंपनीच्या शेअर्सच्या मूल्यामध्ये 26 टक्के तेजी आली आहे. एका महिन्याच्या काळात 20 टक्के उसळी नोंदवली गेली आहे. सहा महिन्यांचा विचार केला, तर शेअर मार्केटमध्ये करेक्शन असलं, तरी त्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांना 105 टक्क्यांहून अधिक मल्टिबॅगर रिटर्न मिळाला आहे. त्या व्यतिरिक्त एका वर्षाच्या कालावधीत 650 टक्क्यांचा मोठा नफा झाला आहे.
आज, मंगळवारी सीएनआय रिसर्च या कंपनीच्या शेअरने 17.19 रुपयांच्या पातळीवर कामकाजाला सुरुवात केली. काही वेळातच पाच टक्क्यांच्या अपर सर्किटसह 17.28 रुपयांच्या पातळीवर 52 आठवड्यांच्या नव्या उच्चांकी पातळीला त्याने स्पर्श केला. याआधी सोमवारीही या शेअरने 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला होता. या पेनी स्टॉकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बायर्स सक्रिय आहेत. त्यामुळे तेजी दिसत आहे.