सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र, निवडक कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी हिस्सेदारी वाढवली आहे, याचा अर्थ ते या कंपन्यांच्या फंडामेंटल्सवर आणि भविष्यातील वाढीवर सकारात्मक आहेत. कोटक इंस्टीट्यूशनल इक्विटीज च्या अहवालानुसार, या कंपन्यांचे बिझनेस मॉडेल मजबूत असल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर हिस्सेदारी वाढवली आहे. या कोणत्या कंपन्या आहेत आणि त्याचा कसा फायदा होईल सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
FII_Investment_2024-2025-03-225aa66ec9269557aa6d62165eb4792e
एफआयआय खरेदीमुळे गुंतवणूकदारांना काय फायदा होईल?
विश्वासार्हता वाढते: जेव्हा परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर शेअर्स खरेदी करतात, तेव्हा त्या कंपन्यांवर बाजाराचा विश्वास वाढतो.
शेअर्सच्या किमती वाढण्याची शक्यता: दीर्घकालीन दृष्टिकोनातून पाहता, अशा कंपन्यांचे शेअर्स भविष्यात वाढू शकतात.
सेक्टरनुसार गुंतवणुकीचे संधी: हाऊसिंग फायनान्स, आयटी आणि रिअल इस्टेट कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांसाठी संधी उपलब्ध असू शकते.
परदेशी गुंतवणूक वाढण्यामागचे कारण?
अहवालानुसार, या कंपन्यांचा बिझनेस मॉडेल मजबूत आहे आणि लाँग टर्म ग्रोथ ची मोठी शक्यता आहे. जरी बाजारात अस्थिरता असली तरी या निवडक कंपन्यांमध्ये FII चा विश्वास कायम आहे, याचा अर्थ त्यांनी या कंपन्यांना आणि त्यांच्या सेक्टरला भविष्यातील विजेते म्हणून ओळखले आहे.
FII Buying म्हणजे काय?
FII म्हणजे Foreign Institutional Investors - म्हणजेच जे परदेशी इन्व्हेस्टर्स (गुंतवणूकदार) असतात, जे आपल्यासारख्या भारताबाहेरच्या देशांमध्ये शेअर्स किंवा सिक्युरिटीजमध्ये पैसे गुंतवतात.
FIIs कोण असतात?
हे कोणतेही इन्व्हेस्टमेंट फंड्स किंवा मोठ्या कंपन्या असतात जसे की – Mutual Funds, Insurance Companies, Hedge Funds, Banks, Pension Funds, FII ला SEBI कडे रजिस्टर करावं लागतं आणि त्यांचे नियम पाळावे लागतात.
FII Buying का Important आहे?
जेव्हा FIIs मोठ्या प्रमाणावर स्टॉक्स खरेदी करतात तेव्हा – मार्केटमध्ये पैसा येतो (Liquidity वाढते), शेअर्सचे प्राइसेस वाढतात आणि इकॉनॉमीला गती मिळते. जर FIIs ने विक्री सुरू केली तर मार्केटमध्ये घसरण (Crash) होऊ शकतं.
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)