TRENDING:

फक्त 4 मिनिटांत एका बातमीनं शेअर मार्केटमध्ये खळबळ! या शेअरला 'Upper Circuit' लागलं

Last Updated:

गोदावरी बायोरेफिनरीज लिमिटेडच्या शेअरला चीनमध्ये कॅन्सर उपचारासाठी पेटंट मिळाल्याने अप्पर सर्किट लागलं. शेअर 311.84 रुपयांवरून 327.43 रुपयांवर गेला. कंपनीचे मार्केट कॅप 1675 कोटी रुपये आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शेअर मार्केटमध्ये सोन्या चांदीचे दर वाढले आहेत. काही शेअर्सच्या किंमती अचानक वर जायला लागल्या तर काही शेअर्स कोसळले, या अस्थिर मार्केटमध्ये एक मोठी बातमी आली आणि अचानक खळबळ उडाली. लोक शेअर घेण्यासाठी धडपड करू लागले. लोकांनी बोली लावल्यासारखीच अवस्था झाली आणि अवघ्या 4 मिनिटांत या शेअरला अप्पर सर्किट लागलं. हा कोणत्या कंपनीचा शेअर आहे त्याची किंमत किती आहे आणि असं काय घडलं ज्यामुळे अप्पर सर्किट लागलं जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

एका मोठ्या कंपनीच्या शेअरला आज सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी अप्पर सर्किट लागलं. एक्सचेंजला कंपनीने कळवले की त्यांनी कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या एका अभिनव अँटी-कॅन्सर मॉलिक्युलसाठी चीनमध्ये पेटंट मिळवले आहे. ही महत्त्वपूर्ण माहिती कंपनीची बायोटेक शाखा सॅथजेन थेरप्यूटिक्स (Sathgen Therapeutics) मुळे शक्य झाली आहे, जी कॅन्सर आणि व्हायरल आजारांवर नवीन औषधांवर संशोधन करत आहे. कंपनीचे सध्याचे मार्केट कॅप जवळपास 1675 कोटी रुपये आहे.

advertisement

काय आहे हे नवीन अँटी-कॅन्सर मॉलिक्युल?

या नवीन मॉलिक्युलचे नाव HYDROXY-1,4-NAPHTHALENEDIONE आहे. हे एका नवीन कंपाउन्ड आहे, जे कॅन्सर आणि कॅन्सर स्टेम सेल्सवर अत्यंत प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ब्रेस्ट आणि प्रोस्टेट कॅन्सरसारख्या आजारांवर विशेष परिणामकारी असेल असं संशोधनातून समोर आल्याची माहिती नुकतीच कंपनीनेद दिली आहे. मागच्या काही वर्षांत ब्रेस्ट कॅन्सर आणि प्रोस्टेट कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वेगानं वाढत आहे.

advertisement

गोदावरी बायोरेफिनरीज लिमिटेडमध्ये तेजी

गोदावरी बायोरेफिनरीज लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीचा शेअर 311.84 रुपयांवर उघडला होता. त्यानंतर ठीक 11:46 वाजता बातमी आली आणि 11 वाजून 50 मिनिटांनी शेअर 327.43 रुपयांच्या अप्पर सर्किटवर लॉक झाला.

गोदावरी बायोरेफिनरीजच्या कार्यकारी संचालक डॉ. संगीता श्रीवास्तव यांनी सांगितले की, "आम्ही आता ग्रीन केमिस्ट्रीच्या पलीकडे जाऊन लाइफ सायन्सेसच्या दिशेने गंभीरपणे काम करत आहोत." त्यांनी पुढे असेही म्हटले की, चीनमधून मिळालेले हे पेटंट या मॉलिक्युलच्या क्षमतेची आणखी पुष्टी करते आणि आमच्या रिसर्च टीम उत्साह वाढवते.

advertisement

आंतरराष्ट्रीय स्तरावर कंपनीची उपस्थिती

गोदावरी बायोरेफिनरीजची जागतिक स्तरावर उपस्थिती आहे. कंपनी 20 हून अधिक देशांमध्ये निर्यात करते आणि आंतरराष्ट्रीय R&D नेटवर्कशी जोडलेली आहे. तिचे बायोटेक डिव्हिजन सॅथजेन थेरप्यूटिक्स आता क्लिनिकल स्टेजमध्ये आहे. प्रमुख मॉलिक्युलला जागतिक पेटंट संरक्षण मिळाल्याने कंपनी आता संशोधनाचे उपचारात रूपांतर अधिक गती देत आहे. कंपनी बायोफ्युएल्स आणि रिन्यूएबल केमिकल्समध्ये आघाडीवर आहे.

advertisement

चीनमध्ये मिळालेले हे पेटंट कंपनीच्या बायोटेक मिशनला आंतरराष्ट्रीय स्तरावर बळकटी देते. याचा अर्थ असा की, गोदावरी बायोरेफिनरीज आता कॅन्सरसारख्या घातक आजारांविरुद्ध औषध संशोधनात जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त कंपनी बनत आहे. येत्या काळात या कंपनीचे शेअर्स आणखी वाढतील असा तज्ज्ञांचा दावा आहे.

(डिस्क्लेमर: कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावी. कोणत्याही फायद्या तोट्यासाठी न्यूज 18 मराठी जबाबदार राहणार नाही.)

मराठी बातम्या/मनी/Share Market/
फक्त 4 मिनिटांत एका बातमीनं शेअर मार्केटमध्ये खळबळ! या शेअरला 'Upper Circuit' लागलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल