वेळोवेळी होणाऱ्या बँकिंग इन्व्हेस्टमेंट संबंधित ट्रान्झॅक्शनवरून सेबीने ही नोटीस बजावली आहे. सेबीच्या म्हणण्यानुसार बँकेने काही नियमांचे पालन केलेले नाही. एचडीएफसी बँकेने SEBI कडून मिळालेल्या या नोटीसची माहिती एक्सचेंजेसना दिली आहे. त्यानंतर गुरुवार एचडीएफसी बँकेचे शेअर्स 0.25 टक्क्यांनी कोसळले होते. आता आज शुक्रवारी सुद्धा याचा परिणाम दिसून येणार का हे पाहावं लागणार आहे.
advertisement
बँकेनं याचा परिणाम बँकेतील खातेधारकांवर होणार नाही असेही म्हटलं आहे. फायलिंगवर कोणतेही परिणाम दिसून येणार नाहीत असे आपल्या निवेदनात म्हटलं आहे. गेल्या 6 महिन्यांत या खासगी बँकेच्या शेअर्समध्ये प्रचंड वाढ झाली होती. या कालावधीत, HDFC बँकेच्या स्टॉकमध्ये सुमारे 18% वाढ झाली. त्यानंतर बँकेचे बाजार भांडवल सुमारे 4 लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे.
सध्या बँकेचे एकूण बाजार भांडवल 14 लाख कोटींच्या पुढे आहे. एचडीएफसीमध्ये विलीनीकरणानंतर एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर त्याचा मोठा परिणाम झाला. बँक मार्जिन आणि अॅसेट्स इक्विटीसोबत शेअर्समध्ये थोडी रिकव्हरी आणि सुधारणा पाहायला मिळाली. या नोटीसनंतर बँकेचे शेअर्स ठेवावे की काढावे याबाबत संभ्रम आहे. मात्र याबाबत तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.
एचडीएफसी बँकेला कव्हर करणाऱ्या एकूण 40 विश्लेषकांपैकी कोणीही स्टॉकवर विक्रीचे मत दिलेले नाही. परदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय) एचडीएफसी बँकेत सातत्याने खरेदी करत आहेत. नोव्हेंबरच्या उत्तरार्धात एफआयआयच्या खरेदीच्या यादीत ही बँक आघाडीवर राहिली. त्यांनी यामध्ये 9,597 कोटींची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे सध्या HDFC बँकेचे शेअर्स होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे.
डिस्क्लेमर- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं जोखमीचं आहे. इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. इथे दिलेलं मतं ही ब्रोकरेज फर्मची आहेत. न्यूज18 मराठी कोणत्याही फायद्या-तोट्याची जबाबदारी घेत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.