जपानी लँडर सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉरपोरेशन आणि MUFG यांनी YES बँकेचे शेअर्स खरेदी करण्यात स्वारस्य असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे एका रिपोर्टनुसार आणि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय स्टेट बँक Yes बँकेतील 24 टक्के भागीदारी विकण्याच्या तयारीत आहे. जपान कंपनीसोबत होणाऱ्या YES बँकेच्या डीलचा परिणाम बँकेच्या शेअर प्राइजवर होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले आहे.
advertisement
Yes बँकच नाही तर ओव्हरऑल बँक निफ्टीवर याचा परिणाम होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे आज शेअर मार्केटवर विशेष लक्ष असणार आहे. गुरुवारी Yes बँकेचा शेअर ग्रीन झोनमध्ये होता. या शेअरने चांगला नफा मिळवून दिला. मार्केट संपतानाही हा शेअर ग्रीन झोनमध्ये होता. थोडक्यात सांगायचे तर गुरुवारी दिवसभरात ह्या शेअरने नफा मिळवून दिला. Yes बँकेचे मार्केट कॅपिटलायझेशन 60520 कोटी रुपये आहे. 52 आठवड्यात शेअर 32.85 रुपये सर्वात हाय किंमतीवर पोहोचला होता.
डिस्क्लेमर: शेअर मार्केटमध्ये पैसे लावणे जोखमीचे आहे. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, कोणत्याही फायद्या तोट्यासाठी न्यूज18 मराठी जबाबदार राहणार नाही. इथे दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.