TRENDING:

इस्रायल-इराण संघर्षात जगभरातील शेअर मार्केटमध्ये भूकंप, गुरुवार ठरणार Black Thrusday?

Last Updated:

यामुळेच विविध देशांतील शेअर मार्केटमध्ये तीव्र विक्रीचा ट्रेंड तयार झाला आहे. पुरवठ्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याच्या भीतीने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जगभरातील बहुतांश शेअर मार्केट्स गडगडली आहेत. संपूर्ण युरोपमध्ये फक्त युनायटेड किंग्डममधील शेअर मार्केट या धक्क्यातून सावरण्यात यशस्वी झालं आहे. आशियातील चीन, हाँगकाँग आणि सिंगापूरमधील मार्केटमध्ये खरेदीचा ट्रेंड दिसला. इतर महत्त्वाच्या शेअर मार्केट्समध्ये विक्रीचा ट्रेंड होता. इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने इस्रायलवर हल्ला केल्यामुळे मध्य पूर्वेतील तणाव वाढण्याची भीती आणखी वाढली आहे.
(शेअर मार्केट)
(शेअर मार्केट)
advertisement

यामुळेच विविध देशांतील शेअर मार्केटमध्ये तीव्र विक्रीचा ट्रेंड तयार झाला आहे. पुरवठ्याशी संबंधित समस्या निर्माण होण्याच्या भीतीने कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. इराणने बुधवारी (2 ऑक्टोबर) सकाळी सांगितलं की, जर चिथावणी दिली गेली नाही तर इस्रायलवर या पुढे कोणताही क्षेपणास्त्र हल्ला करणार नाही. तर इस्त्रायल आणि अमेरिकेने या हल्ल्याचा सूड उगवण्याची तयारी केली आहे.

advertisement

गुंतवणुकदाराचा सोनं आणि बाँडकडे ओढा

इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या वातावरणादरम्यान गुंतवणूकदार घाईघाईने स्टॉक विकत आहेत. ते सुरक्षित पर्यायांकडे वळत आहेत. यामुळे यूएस ट्रेझरी बाँडचं उत्पन्न घसरत असून सोन्याने विक्रमी उच्चांक गाठला आहे. जगातील सर्वांत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या डॉलर या अमेरिकन चलनाने युरोच्या तुलनेत तीन आठवड्यांत सर्वांत मजबूत पातळी गाठली आहे.

advertisement

पुढील ट्रेंड कसा असेल?

मॅक्रो इकॉनॉमिक्सने डॉलरला आधार दिला आहे. याशिवाय अमेरिकेतील मजबूत जॉब मार्केटमुळे नोव्हेंबरमध्येही यूएस फेड व्याजदरात कपात करेल, अशी शक्यता आहे. या महिन्यात युरो झोनमधील चलनवाढीच्या स्थितीने युरोपियन सेंट्रल बँकेच्या सुलभतेला समर्थन दिलं.

ऑस्ट्रेलियन ऑनलाइन ट्रेडिंग कंपनी पेपरस्टोनमधील रिसर्च हेड ख्रिस वेस्टन म्हणाले की, सध्या मार्केटमध्ये बरीच अस्थिरता आहे. अर्थशास्त्र, कॉर्पोरेट कमाई आणि मध्यवर्ती बँकांच्या प्रतिक्रिया या घटकांवर भौगोलिक राजकारणाचा परिणाम होईल. इस्रायल किंवा इराणकडून आक्रमकता वाढली किंवा शांतात बाळगली गेली तर मार्केट सेंटिमेंटवर मोठा परिणाम होऊ शकतो. याशिवाय अमेरिकेतील राजकारणाचा मार्केटवरील घडामोडींवर परिणाम होऊ शकतो. कारण, बुधवारी डेमोक्रॅटिक पक्षाचे टिम वॉल्झ आणि रिपब्लिकन पक्षाचे जेडी व्हॅन्स उपराष्ट्रपतिपदाच्या डिबेटमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

advertisement

कशी आहे आकडेवारी?

युनायटेड किंग्डममधील शेअर मार्केट निर्देशांक एफटीएसई 0.48 टक्क्यांनी मजबूत झाला. अमेरिकेतील डाउ जोन्स फ्युचर्स, एस अँड पी 500 आणि नदास्क हे तीन निर्देशांक घसरले आहेत. नदास्क 1.53 टक्क्यांनी, डाउ जोन्स फ्युचर्स 0.25 टक्क्यांनी आणि एस अँड पी 500 देखील 0.93 टक्क्यांनी घसरला. फ्रान्समधील सीएसी 0.81 टक्क्यांनी आणि जर्मनीतील डीएएक्स 0.58 टक्क्यांनी घसरून बंद झाला.

advertisement

आशियातील मार्केट्सचा विचार केल्यास, आज हाँगकाँगमधील हँग सेंग 5.95 टक्क्यांनी आणि सिंगापूरमधील स्ट्रेट्स टाइम्स 0.33 टक्क्यांनी वधारले आहेत. जपानमधील निक्केई 1.68 टक्क्यांनी घसरला आहे. दक्षिण कोरियातील कोस्पी 0.24 टक्के आणि इंडोनेशियातील जकार्ता कंपोझिट 0.71 टक्क्यांनी घसरले आहेत. भारतात आज गांधी जयंतीनिमित्त शेअर मार्केट बंद आहे. मात्र, गिफ्ट निफ्टी 0.89 टक्क्यांनी घसरला आहे.

ब्रेंट क्रूड फ्युचर्सचा दर 1 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 74.33 डॉलर्सवर पोहचला आहे. यूएस डब्ल्यूटीआय फ्युचर्सचा दर 1.3 टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल 70.73 डॉलर्सवर पोहचला. सोन्याच्या दरांत एका टक्क्याने वाढ झाली होती. सध्या त्यात 0.16 टक्क्यांनी घसरण होऊन सोन्याचा दर प्रति औंस 2,658.63 डॉलर्स इतका झाला आहे. गेल्या महिन्यात सोन्याने 2,685.42 डॉलर्सचा विक्रमी उच्चांक गाठला होता. बेंचमार्क 10-वर्षाचं ट्रेझरी उत्पन्न 1.5 बेसिस पॉइंट्सने घसरून 3.7278 टक्क्यांवर आलं आहे. डॉलर निर्देशांकाने पुन्हा एकदा 101 चा टप्पा ओलांडला असून सध्या तो 101.39 वर आहे.

मराठी बातम्या/मनी/Share Market/
इस्रायल-इराण संघर्षात जगभरातील शेअर मार्केटमध्ये भूकंप, गुरुवार ठरणार Black Thrusday?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल