नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शेअर मार्केट प्री ओपनमध्ये लाल रंगात व्यवहार करत आहे. रुपया 10 रुपयांनी कमजोर झाला आहे. शेअर मार्केट प्री ओपन होताच लाल रंगात व्यवहार करत आहे. सेन्सेक्स 82,886 अंकांवर आहे. तर निफ्टी 25,400 अंकांवर आहे. सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टी प्री ओपनिंगदरम्यान 408 अंकांनी कोसळलं आहे. जपानच्या मार्केटमध्ये पुलबॅक होत असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहे.
advertisement
भारतीय ट्रेडरला किती सतर्क राहायला हवं?
अनुज सिंघल म्हणाले, संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी जर शेअर्स खरेदी केले तर त्यांना लाँग टर्ममध्ये फायदा होऊ शकतो. मागच्या 40-50 वर्षांतला इतिहास काढून पाहावा, जिओ पॉलिटिकल इम्पॅक्टमुळे जेव्हा शेअर मार्केट खाली येतं तेव्हा तुम्ही गुंतवणुकीवर भर द्यायला हवा. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करा. पॅनिक होऊन तुमच्या हातातले स्टॉक्स विकू नका.
प्री ओपनिंगमध्ये मिडकॅप शेअर्स 850 अंकांनी कोसळले आहेत. BSE मध्ये सर्व इंडेक्स स्टॉक्स कोसळले आहेत. सध्या वेट आणि वॉच करायला हवं, विकण्याची किंवा खरेदी करण्याची गडबड करू नका. चांगल्या कंपन्यांचे शेअर्स पाहून अभ्यास करुन गुंतवणूक करा असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहेत.
शेअर मार्केटवर फक्त जिओ पॉलिटिकलचा इम्पॅक्ट नाही तर सेबीचे निर्णय, F&O ट्रेडिंगच्या निर्णयामुळे देखील शेअर मार्केटवर त्याचा परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीचे स्टॉक्स सध्या हिरव्या रंगात वेगाने धावत आहेत. CSB आणि साऊथ बँक सोडून इतर बँकांचे स्टॉक्स थोडे वर खाली होत आहेत.
इराण आणि इस्रायलच्या संघर्षाचे पडसाद हळूहळू जगभरात दिसू लागले आहेत. कच्च्या तेलाच्या किंमती वाढायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे सोनं ऑल टाईम हायवर पोहोचलं आहे. तर शेअर मार्केटवरही मोठा परिणाम झाला आहे. ग्लोबल मार्केटमध्ये मोठा दबाव निर्माण झाला आहे. गिफ्ट निफ्टी 300 अंकांनी कोसळला असून त्याचे परिणाम आशियातल्या शेअर मार्केटवर दिसणार आहेत. चीन आणि कोरियाचं शेअर मार्केट आज बंद राहणार आहे.
इस्रायल आणि इराणमध्ये मंगळवारपासून तणाव वाढला आहे. इराणने इस्रायलवर मिसाईल अॅटेक केला. इराणने खूप मोठी चूक केल्याचं इस्रायलने म्हटलं आहे. याची योग्य ती किंमत इराणला चुकवावीच लागेल असं इस्रायलच्या राष्ट्राध्यक्षांनी इशारा दिला आहे. इस्रायल आणि इराणच्या संघर्षामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. ब्रेंट 5 टक्क्यांनी वधारलं असून 75 डॉलर्सवर पोहोचलं आहे.