सायंट डीएलएम
सायंट डीएलएम कंपनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करते. तिचं मार्केट कॅप 5316 कोटी रुपये आहे. त्या कंपनीच्या शेअर्समध्ये 43.2 टक्के अपसाइड पोटेन्शियल आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की या कंपनीचा तांत्रिक क्षेत्रातला विकास काही संधी घेऊन येऊ शकतो.
महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स
ही कंपनी रियल इस्टेट सेक्टरमध्ये कार्यरत आहे. तिचं मार्केट कॅप 7751 कोटी रुपये आहे. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, ही कंपनी वेगाने विकसित होत असून, आगामी काळात चांगली कामगिरी करू शकते. त्या कंपनीच्या शेअरमध्ये 51.1 टक्के अपसाइड पोटेन्शियल दिसत असून, बाय रेटिंग देण्यात आलं आहे.
advertisement
गॅलॅक्सी सरफॅक्टंट्स
ही कंपनी सरफॅक्टंट्स आणि केमिकल्सचं उत्पादन करते. तिचं मार्केट कॅप 10,257 कोटी रुपये आहे. कंपनीची निर्यात आणि विक्री यांच्या वाढीमुळे भविष्यात चांगले रिटर्न्स मिळण्याची शक्यता आहे. या शेअर्समध्ये 40.7 टक्के अपसाइड पोटेन्शियल दिसत आहे.
व्होल्टॅम्प ट्रान्सफॉर्मर्स
ही कंपनी विजेच्या उपकरणांच्या क्षेत्रात काम करते. तिचं मार्केट कॅप 11,402 कोटी रुपये आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 48.2 टक्के अपसाइड पोटेन्शियल दिसत आहे. त्यामुळे बाय रेटिंग देण्यात आलं आहे.
बिर्ला कॉर्पोरेशन
ही कंपनी सिमेंट उद्योगात काम करत असून, तिचं मार्केट कॅप 10,027 कोटी रुपये आहे. उत्तम आर्थिक कामगिरी आणि मजबुती यांमुळे या कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी येण्याची अपेक्षा आहे. शेअरमध्ये 43.6 टक्के अपसाइड पोटेन्शियल असल्याने स्ट्राँग बाय रेटिंग मिळालं आहे.
कजारिया सिरॅमिक्स
कजारिया सिरॅमिक्स ही कंपनी सिरॅमिक टाइल्सचं उत्पादन करत असून, तिचं मार्केट कॅप 19,254 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये 48.1 टक्के अपसाइड पोटेन्शियल आहे.
मणप्पुरम फायनान्स
आर्थिक सेवा प्रदान करणारी ही कंपनी खासकरून गोल्ड लोनच्या क्षेत्रात ती काम करते. तिचं मार्केट कॅप 15,041 कोटी रुपये आहे. या शेअरमध्ये 46.3 टक्के अपसाइड पोटेन्शियल दिसत आहे.
हा सल्ला केवळ माहितीसाठी दिला असून, प्रत्यक्ष गुंतवणूक आपल्या वैयक्तिक सल्लागाराच्या सल्ल्याने आणि स्वतःच्या जोखमीवर करावी.