ऑटो, कन्झ्युमर ड्युरेबल्स, कॅपिटल गुड्स, ऑईल अँड गॅस, एनर्जी, एफएमसीजी, हेल्थकेअर, पॉवर, पीएसयू आणि रियल्टी हे सर्व सेक्टोरल इंडेक्स 2 ते 3 टक्क्यांनी घसरले. निफ्टी मिडकॅप इंडेक्स 3 टक्क्यांनी घसरला. तर स्मॉलकॅप इंडेक्समध्ये 3.5 टक्क्यांची घसरण दिसून आली.
प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर म्हणाले, ‘संथ सुरुवातीनंतर बाजारातील बेअर्सनी दमदार पुनरागमन केले. आज संपूर्ण बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. एकदा तर निफ्टी 23,000 च्या सायकॉलॉजिकल सपोर्टच्या खालीही गेला होता. पण शेवटी तो काहीसा सावरला आणि 309.80 अंकांच्या घसरणीसह 23,071.80 वर बंद झाला. सर्व सेक्टर लाल रंगात बंद झाले. यामध्ये रियल्टी आणि मीडियामध्ये सर्वाधिक घसरण दिसली.’
advertisement
‘ब्रॉडर मार्केटमधली विक्री पाहून खरंच वाईट वाटलं. आज मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये जोरदार विक्री झाली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप इंडेक्स अनुक्रमे 3.02 टक्के आणि 3.45 टक्क्यांनी घसरले. बाजारातील टेक्निकल डाटाची परिस्थिती कमकुवत आहे, प्रत्येक उसळीवर विक्रीचा दबाव वाढत आहे. इंडेक्स या आधीच्या 22,800 या सपोर्टपर्यंत जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असं दिसतंय. जर निफ्टीने ही लेव्हल तोडली तर तो 22,600 पर्यंत खाली जाऊ शकतो. वरच्या दिशेला तर, 23,240 या लेव्हलवर लगेच रेझिस्टन्स दिसतो आहे,’ असंही गग्गर यांनी सांगितलं.
जिओजित फायनॅन्शियल सर्व्हिसेसचे रिसर्च हेड विनोद नायर म्हणाले, ‘ बाजाराचं सेंटिमेंट कमकुवत होण्यासाठी अमेरिकेची ट्रेड पॉलिसी, टेरिफबद्दलची अनिश्चितता, देशांतर्गत आर्थिक वाढीची चिंता आणि एफआयआयकडून सातत्याने होत असलेली विक्री ही महत्त्वाची कारणं आहेत. मागणीसंबंधी असलेली चिंता आणि हाय व्हॅल्युएशनमुळे मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. मात्र, आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे रुपया कालच्या विक्रमी नीचांकी पातळीवरून काहीसा सावरला आहे. पण तो दडपणाखाली आहे. नजीकच्या भविष्यात बाजारात अस्थिरता राहण्याची शक्यता आहे. ट्रेडमधील अनिश्चिततेतून सुटका करून घेण्यासाठी गुंतवणुकदारांचं लक्ष पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्याकडे लागलं आहे. त्या दौऱ्यातील निर्णयांमुळे दिलासा मिळेल अशी अपेक्षा त्यांना आहे. अमेरिकेती महागाईसंबंधी आकडेवारीवरही बाजाराचं लक्ष असेल.’