वीर एनर्जी असे या शेअर्सचे नाव आहे. एनर्जी सेक्टरमधील मायक्रोकॅप कंपनीच्या या शेअर्सची खरेदी खूप वाढली आहे, त्यामुळे ते पाच टक्के अप्पर सर्किटसह ब्लॉक झाले. फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सची (FII) भागीदारी असलेल्या या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. एका शेअरची किंमत 25 रुपयांपेक्षा कमी आहे. पेनी स्टॉक कमी काळात जास्त नफा देतात, मात्र बरेचदा गुंतवणूकदारांचे नुकसान होते. पण जोखीम घेण्याची तयारी असलेल्या गुंतवणूकदारांना कमी काळात पेनी स्टॉक्समधून चांगला परतावाही मिळाला आहे.
advertisement
वीर एनर्जीच्या शेअरमध्ये 5% अप्पर सर्किट
वीर एनर्जी अँड इन्फ्राचे शेअर्स आज पाच टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह 23.73 रुपयांच्या लेव्हलवर गेले. या स्टॉकमध्ये फक्त खरेदीदार आहेत. या स्टॉकमध्ये 52 आठवड्यांचा उच्चांक 35.64 रुपये आहे, तर 52 आठवड्यांचा नीचांक 16.41 रुपये आहे. त्याचा (P/E) रेशो 37.67 आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 35.51 कोटी रुपये आहे.
कर्जमुक्त व हाय बूक असलेला पेनी स्टॉक
वीर एनर्जीवर कर्ज नाही, त्यामुळे त्याची हाय बूक व्हॅल्यु 43.2 आहे. बूक व्हॅल्यु डबल होणे म्हणजे कंपनीजवळ स्टॉकच्या दुप्पट संपत्ती आहे. मागील तीन महिन्यापासून या कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी (ROE) लो म्हणजेच 1.57% आहे. या मायक्रोक्रॅप कंपनीत परदेशी गुंतवणूकदारांचा वाटा 0.4 टक्के आहे.
पाच वर्षात किती परतावा दिला?
वीर एनर्जी अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची स्थापना 2006 मध्ये झाली होती. ही रिन्युएबल एनर्जी सेक्टरमधील एक आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी विंड व सोलर एनर्जी प्रोजेक्ट डेव्हलपमेंट, मॅन्युफॅक्चरिंग व ऑपरेशनमध्ये आघाडीवर आहे. मागील पाच दिवसांत वीर एनर्जीचे शेअर्स एक टक्क्यांहून अधिक घसरले आहेत, तर मागील एका महिन्यात या शेअर्समध्ये 13 टक्क्यांहून जास्त वाढ झाली आहे. सहा महिन्यात या शेअर्समध्ये 10 टक्के वाढ झाली. तर कंपनीने एका वर्षात गुंतवणूकदारांना 30 टक्के परतावा दिला. या शेअर्सनी गुंतवणूकदारांना पाच वर्षांत 275 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.