26 सप्टेंबर 2024 रोजी बीएसई सेन्सेक्स 4 नोव्हेंबरपर्यंत 85,836 च्या सर्वकालीन उच्चांकावरून आठ टक्क्यांपेक्षा जास्त खाली घसरला. बीएसई मिड-कॅप आणि बीएसई स्मॉल-कॅप निर्देशांक अनुक्रमे 7.4 टक्के आणि 4.2 टक्क्यांनी घसरले. मार्केटमधील या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचा उत्साह कमी झाला आहे. दुसऱ्या तिमाहीत (Q2) कंपन्यांचे कमकुवत निकाल, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची म्हणजेच एफआयआयची जोरदार विक्री, देशांतर्गत मिड-आणि स्मॉल-कॅप शेअर्सचं वाढतं व्हॅल्युएशन आणि भू-राजकीय तणावामध्ये वाढ, ही या घसरणीमागील मुख्य कारणं आहेत.
advertisement
दीर्घकालीन गुंतवणुकीचं लक्ष्य
आर्थिक सल्लागारांचं म्हणणं आहे की, गुंतवणूकदारांनी आपल्या दीर्घकालीन गुंतवणुकीच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रीत करताना मार्केटमधील अशा अल्पकालीन चढउतारांमुळे त्रस्त होऊ नये. मार्केटमधील सध्याच्या अस्थिरतेबद्दल चिंतित असलेल्या मीडियम रिस्क गुंतवणूकदारांसाठी अॅग्रेसिव्ह हायब्रिड म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे.
रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजर पीयूष पांडे म्हणाले, "हायब्रीड फंड उप-श्रेणींमध्ये आक्रमक हायब्रीड फंड 65 ते 80 टक्के इक्विटीमध्ये आणि उर्वरित डेट अॅसेट्समध्ये गुंतवत आहेत. इक्विटीमध्ये जास्त हिस्सा टाकल्याने इक्विटी मार्केटच्या रॅलींदरम्यान चांगला रिटर्न मिळू शकतो, तर डेट एक्सपोजरमुळे मार्केटमधील मंदीच्या काळात तोटा कमी होण्यास मदत होते. कर आकारणीच्या दृष्टीने विचार केला तर, या फंडांना इक्विटी फंडासारखंच मानलं जातं."
अनेक अप-डाउन सायकल
गेनिंग ग्राउंड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे संचालक रवी कुमार टी. व्ही. म्हणाले, "मार्केटमधील सध्याचं वातावरण बघता अनेक अप-डाउन सायकलचा सामना केलेले गुंतवणूकदार सक्रियपणे मॅनेज्ड अॅग्रेसिव्ह हायब्रिड फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. हे फंड सामान्यत: लार्ज, मिड आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवणुकीसह एक चांगला इक्विटी कपोनंट बाळगतात. तर, डेट कंपोनंट क्रेडिट, व्याज दर आणि कालावधी धोरणांच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न देतात."
कुमार असंही म्हणाले की, गरज पडल्यास फंड निगेटिव्ह कॉम्प्लेक्स इकोनॉमिक सयइकल्समधून मार्ग काढत आपली इक्विटी आणि बाँडचं कंपोझिशन अॅडजस्ट करतात.
याठिकाणी काही आघाडीच्या अॅग्रेसिव्ह हायब्रिड फंड्सबाबत माहिती देण्यात आली आहे. 10 वर्षांच्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनमधील (SIP) परताव्यानुसार या फंडांची निवड करण्यात आलेली आहे.
क्वांट ॲब्सोल्युट फंड
10 वर्षाचा SIP परतावा (XIRR): 18.9 टक्के
फंड मॅनेजर: अंकित ए पांडे, वासव सहगल आणि संजीव शर्मा
ICICI प्रुडेंशियल इक्विटी आणि डेट फंड
10 वर्षाचा SIP परतावा (XIRR): 18.5 टक्के
फंड मॅनेजर: मितुल कलावडिया आणि शंकरन नरेन, अखिल कक्कर, मनीष बंठिया, शर्मिला डिमेलो आणि श्री शर्मा
जेएम अॅग्रेसिव्ह हायब्रिड फंड
10 वर्षाचा SIP परतावा (XIRR): 17.5 टक्के
फंड मॅनेजर: असित भंडारकर, सतीश रामनाथन, चैतन्य चोकसी आणि रुची फौजदार
एडलवाईस अॅग्रेसिव्ह हायब्रिड फंड
10 वर्षाचा SIP परतावा (XIRR): 15.4 टक्के
फंड मॅनेजर: भरत लाहोटी, भावेश जैन, राहुल देधिया आणि प्रणवी कुलकर्णी
कोटक इक्विटी हायब्रिड फंड
10 वर्षाचा SIP परतावा (XIRR): 15.4 टक्के
फंड मॅनेजर: अभिषेक बिसेन आणि अतुल भोळे
यूटीआय अॅग्रेसिव्ह हायब्रिड फंड
10 वर्षाचा SIP परतावा (XIRR): 15.2 टक्के
फंड मॅनेजर: व्ही श्रीवत्स आणि सुनील मधुकर पाटील
डीएसपी इक्विटी आणि बाँड फंड
10 वर्षाचा SIP परतावा (XIRR): 14.7 टक्के
फंड मॅनेजर: अभिषेक सिंह आणि केदार कर्णिक
कॅनरा रोबेको इक्विटी हायब्रीड फंड
10 वर्षाचा SIP परतावा (XIRR): 14.4 टक्के
फंड मॅनेजर: एनेट फर्नांडिस, श्रीदत्त भंडवालदार आणि अवनीश जैन