TRENDING:

2 रुपयापेक्षा कमी स्टॉकने शेअर मार्केटमध्ये आणलंय तुफान, खरेदीसाठी चढाओढ

Last Updated:

काही पेनी स्टॉक्समध्येही सकारात्मक हालचाल दिसून येत असून काहींनी अप्पर सर्किट्स गाठलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये चढउतार बघायला मिळत आहेत. सोमवारी शेअर मार्केटमध्ये विक्रीचा ट्रेंड होता. त्यामुळे काही काळासाठी निफ्टी 380 अंकांनी घसरून 25800 च्या खाली ट्रेड करत होता. मार्केटमधील या घसरणीबरोबरच काही शेअर्समध्ये वाढ देखील दिसली. वाढ झालेल्या शेअर्समध्ये मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्सचा समावेश आहे. काही पेनी स्टॉक्समध्येही सकारात्मक हालचाल दिसून येत असून काहींनी अप्पर सर्किट्स गाठलं आहे.
News18
News18
advertisement

नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेडच्या पेनी स्टॉकने सलग दुसऱ्या दिवशी अप्पर सर्किट गाठलं. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेडचे शेअर्स 10 टक्क्यांनी वाढून 1.67 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. या कालावधीत शेअर्सच्या किमतीत चारपेक्षा जास्त वेळा वाढ झाल्याने व्हॉल्युममध्ये वाढ झाली. या शेअरची 52 आठवड्यांतील उच्च पातळी 3.52 रुपये आणि निम्न पातळी 1.35 रुपये आहे.

advertisement

शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, कंपनीच्या प्रमोटर्सकडे फक्त 14.86 टक्के हिस्सा आहे. जून 2024 पर्यंत 85.13 टक्के हिस्सा सामान्य गुंतवणुकदारांकडे होता. 0.05 ते रु. 1.67 प्रति शेअर किंमत असलेल्या या शेअरने तीन वर्षांत 3,200 टक्के मल्टिबॅगर परतावा दिला आहे.

एनबीएफसी स्टँडर्ड कॅपिटलने भारतातील अक्षय्य ऊर्जा (रिन्युएबल एनर्जी) आणि इलेक्ट्रिक व्हेईकल (ईव्ही) प्रोजेक्ट्सना पाठिंबा देण्यासाठी फायनान्स प्रोग्रॅम सुरू केला आहे. भारताच्या क्लीन एनर्जी उद्दिष्टांच्या अनुषंगाने, स्टँडर्ड कॅपिटलचा वित्तीय विभाग सोलर पॅनेल आणि इतर अक्षय्य ऊर्जा युनिट्स स्थापन करण्यासाठी विविध प्रकल्पांना आर्थिक मदत करेल. या उपक्रमात शैक्षणिक संस्था आणि निवासी सोसायट्यांसाठी झिरो-कॉस्ट ईएमआय फायनान्स सुविधेचा देखील समावेश आहे. त्यामुळे ग्रीन एनर्जीचा अवलंब अधिक सोपा होईल.

advertisement

2023 पर्यंत 68 गीगावॅटपेक्षा जास्त क्षमतेची सौर पॅनल्स बसवून भारताने क्लीन एनर्जी क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. ही प्रगती देशाच्या अक्षय्य ऊर्जा क्षमता साध्य करण्याच्या महत्त्वाकांक्षी लक्ष्याच्या अनुषंगाने महत्त्वाची आहे. देशाची अक्षय्य ऊर्जा क्षमता 2030 पर्यंत 500 गीगावॅटपर्यंत वाढवण्याचा मानस आहे.

या उपक्रमांतर्गत असलेल्या प्रत्येक प्रोजेक्टचं मूल्य 50 लाख रुपये आहे. त्यामुळे कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर एनर्जी सोल्युशन प्रदान करणं शक्य होईल. QuickTouch ही सहभागी कंपनी 10 शैक्षणिक संस्थांमध्ये सौर पॅनेल बसवण्याची योजना आखत आहे.

advertisement

स्वच्छ आणि अधिक ऊर्जा-कार्यक्षम भविष्याकडे भारत वाटचाल करत आहे. भारतातील अक्षय ऊर्जा आणि ईव्ही मोबिलिटीला समर्थन देऊन स्टँडर्ड कॅपिटल या संक्रमणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

मराठी बातम्या/मनी/Share Market/
2 रुपयापेक्षा कमी स्टॉकने शेअर मार्केटमध्ये आणलंय तुफान, खरेदीसाठी चढाओढ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल