गुंतवणूकदारांनी काय करायला हवं?
या तज्ज्ञांनी गुंतवणूदारांना दिलासा देणाऱ्या गोष्टी सांगितल्या. त्यांनी गुंतवणूक कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. दीर्घकालीन गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला परतावा मिळेल, असं त्यांनी सांगितलं.
20 वर्षांत मार्केट 10-15 पट होईल
Enam चे मनीष चोखानी म्हणाले, पुढच्या दोन दशकात जर शेअर मार्केटचे प्रमुख इंडेक्स आतापेक्षा 15-20 पट वाढले नाहीत, तरच आश्चर्याची गोष्ट. "भारतीय बाजारामध्ये गुंतवणूक न ठेवणं जोखमीचं असेल," असं त्यांनी सांगितलं. बीएसईचे मेंबर रमेश दमानी म्हणाले, एक किंवा दोन तिमाहीत मार्केट करेक्शन होऊ शकतं. मोतीलाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे रामदेव अग्रवाल म्हणाले, की कंपन्यांच्या उत्पन्नवाढीमध्ये सुधारणा होईल. ही हिंमत ठेवायची वेळ आहे.
advertisement
विकासामध्ये पायाभूत सुविधांची महत्त्वाची भूमिका
एनएसईचे एमडी व सीईओ आशीषकुमार चौहान यांनी इंडियन स्टॉक मार्केट्सच्या प्रवासाबद्दल सांगितलं. 25 वर्षांपूर्वी 'सट्टा बाजार' म्हणून सुरू झालेला प्रवास आता खूप पुढे गेलाय. आता लिस्टेड शेअर्सचं एकूण मार्केट कॅपिटलायझेशन बँकिग सिस्टीमच्या दीड ते दुप्पट झाले आहं. भारताच्या विकासात इन्फ्रास्ट्रक्चर अर्थात पायाभूत सुविधांची महत्त्वाची भूमिका असेल, असं दमानी म्हणाले. आज डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सर्वाधिक शक्यता दिसत आहेत.
तंत्रज्ञानावर आधारित बिझनेसची चांगली कामगिरी
रामदेव अग्रवाल यांच्या मते, डिजिटल थीम चांगली कामगिरी करील. त्यांनी कॅपिटल मार्केट इंटरमीजिअरीजवर विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, याद्वारे अनेक नवीन कंपन्या पुढे येतील. त्या भारतातल्या समस्यांवर उपाय दाखवतील. दीर्घकाळात फायनान्शिअल सेक्टर चांगली कामगिरी करील. गुंतवणूकादारांनी तंत्रज्ञानावर आधारित व्यवसायांवर लक्ष केंद्रित करावं, असा सल्ला आशीष कुमार चौहान यांनी दिला.
मनीष चोखानी यांनी अमेरिकेची अर्थव्यवस्था आणि फायनान्शिअल मार्केटचं उदाहरण दिलं. जगभरातील शेअर मार्केटच्या कॅपिटलायझेशनमध्ये अमेरिकेच्या मार्केटचा वाटा 66 टक्के आहे. जगभरातल्या जीडीपीमध्ये अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा वाटा 25 टक्के आहे. ग्लोबल मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये भारतीय मार्केटचा वाटा फक्त चार टक्के आहे, तर ग्लोबल जीडीपीमध्ये फक्त 7-8 टक्के वाटा आहे. यावरून भारतासाठी पुढे किती शक्यता आहे ते दिसून येते. पुढच्या पाच वर्षांत भारतीय चलनात मजबुती दिसून येईल, असं चोखानी म्हणाले.
प्रत्येक महिन्याला 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक
चोखानी म्हणाले, 'येत्या पाच वर्षांत भारतीय बाजारातलं भांडवल खूप वाढेल. आता आपल्याला मार्केटमधल्या 10 अब्ज डॉलरच्या विक्रीची चिंता आहे; मात्र माझ्या मते येत्या काळात प्रत्येक महिन्याला 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक होईल.' ऑक्टोबरमध्ये भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी 1.1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त विक्री केली.
