TRENDING:

पाच टक्क्यांचं अपर सर्किट; 6 महिन्यांत 90 टक्के रिटर्न्स, कोणता आहे हा पेनी स्टॉक?

Last Updated:

Penny Stock: टीमो प्रॉडक्शन्सच्या शेअर्समध्ये चालू आठवड्यात म्हणजे गेल्या चार कामकाज दिवसांत 32 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली गेली आहे

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नोव्हेंबर महिन्यात शेअर बाजारात घसरण होत होती; मात्र डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाजार तेजीत होते. दुसऱ्या आठवड्यात मात्र ती तेजी कमी झाली. आज, गुरुवारी बाजारात स्टॉक स्पेसिफिक अॅक्शन पाहायला मिळाली. आजच्या व्यवहारात फिल्म प्रॉडक्शन आणि डिस्ट्रिब्युशन करणाऱ्या टीमो प्रॉडक्शन्स एचक्यू लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये पाच टक्के अपर सर्किट लागलं आहे. या मायक्रोकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये या आठवड्यात मोठी तेजी आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदार या पेनी स्टॉककडे सतत आकर्षित होत आहेत आणि खरेदी केली जात आहे. या स्टॉकविषयी अधिक जाणून घेऊ या.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो
advertisement

टीमो प्रॉडक्शन कंपनीच्या स्टॉकचा इयर टू डेट रिटर्न 86.09 टक्के एवढा आहे. प्रॉफिट टू अर्निंग रेशो 26.40 एवढा आहे. ही एक मायक्रोकॅप कंपनी असून, तिचं मार्केट कॅपिटलायझेशन 234.59 कोटी रुपये एवढं आहे. त्याशिवाय या ROCE 9.19 टक्के, तर ROE 6.94 टक्के आहे. याच्या बुक व्हॅल्यूबद्दल बोलायचं झालं, तर करंट मार्केट प्राइस 2.14 रुपयांच्या बदल्यात 1.24 आहे. ही चांगली स्थिती आहे. त्यामुळे कंपनीचे फंडामेंटल्स मजबूत आहेत.

advertisement

टीमो प्रॉडक्शन्सच्या शेअर्समध्ये चालू आठवड्यात म्हणजे गेल्या चार कामकाज दिवसांत 32 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली गेली आहे. एका महिन्याचा विचार केल्यास 52 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवली गेली आहे. 6 महिन्यांच्या कामगिरीचा विचार केला, तर या कालावधीत टीमो प्रॉडक्शन्स एचक्यू कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना जवळपास 90 टक्क्यांचा विक्रमी परतावा दिला आहे. एका वर्षाच्या कालावधीत गुंतवणूकदारांना 80 टक्क्यांहून अधिक नफा झाला आहे.

advertisement

आज काय झालं?

टीमो प्रॉडक्शन्स कंपनीचा शेअर आज 5 टक्क्यांच्या अपर सर्किटसह 2.14 रुपयांच्या दरावर खुला झाला. त्यासोबतच त्याने 52 आठवड्यांची नवी उच्चांकी पातळी गाठली आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी एक रुपया आहे. गेल्या एका महिन्यापासून या शेअरमध्ये गुंतवणुकीचा कल वाढला असून, मोठी खरेदी होत आहे.

सर्वसाधारणपणे पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणं हे नेहमीच जोखमीचं असतं; मात्र काही गुंतवणूकदारांना ते मालामाल करतात.

advertisement

मराठी बातम्या/मनी/Share Market/
पाच टक्क्यांचं अपर सर्किट; 6 महिन्यांत 90 टक्के रिटर्न्स, कोणता आहे हा पेनी स्टॉक?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल