शेअरची आताची स्थिती – 3% वाढ आणि मजबूत ट्रेंड
शुक्रवारी PTC Industries चा शेअर 3% वाढीसह 12,249 रुपयांवर बंद झाला. गेल्या आठवड्यातच (3 मार्च ते 7 मार्च) या शेअरने तब्बल 18% वाढ दर्शवली आहे.दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी हा स्टॉक एक सुवर्णसंधी ठरू शकतो.
6 महिन्यांत घसरण, पण दीर्घकालीन रिटर्न जबरदस्त!
गेल्या 6 महिन्यांत शेअरमध्ये 14% घसरण झाली आहे. या वर्षी जानेवारीपासून आतापर्यंत शेअर 7% खाली आला आहे. मात्र, दीर्घकालीन गुंतवणूकदारांना हा शेअर प्रचंड फायदा देत आहे. एका वर्षात 50% परतावा गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला आहे. एक वर्षापूर्वी या शेअरची किंमत 8,169 रुपये होती, जी आता 12,249 रुपये आहे. याचा अर्थ, गेल्या एका वर्षात 50% परतावा मिळाला आहे. जर कोणी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर ते आता 1.5 लाख झाले असते.
advertisement
5 वर्षांत 9858% वाढ – 1 लाखाचे झाले 1 कोटी!
5 वर्षांपूर्वी या शेअरची किंमत फक्त 123 रुपये होती. आज ती 12,249 रुपयांवर पोहोचली आहे. याचा अर्थ, या शेअरने 9858% परतावा दिला आहे. जर कोणी 5 वर्षांपूर्वी 1 लाख गुंतवले असते, तर ते आता 1 कोटी झाले असते!
कंपनीचे अहवाल काय सांगतो?
PTC Industries Ltd ही कंपनी एयरोस्पेस, डिफेन्स, ऑईल & गॅस, पॉवर आणि मरीन इंडस्ट्रीसाठी उच्च-तंत्रज्ञान कास्टिंग आणि डिझाईन सोल्यूशन्स पुरवते. या क्षेत्रात कंपनीची मोठी मागणी आहे. डिसेंबर 2024 तिमाहीत कंपनीने विक्रमी नफा कमावला. 2023 च्या तुलनेत कंपनीचा नफा 76% वाढून 14.24 कोटी रुपये झाला. BSE नुसार, कंपनीचे मार्केट कॅप सध्या 18,354.13 कोटी रुपये आहे.
गुंतवणूकदारांसाठी काय संधी आहे?
ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी PTC Industries हा चांगला पर्याय ठरू शकतो. सध्याच्या किंमतीत घसरण पाहता, हा शेअर आणखी चांगली संधी देऊ शकतो. बाजारातील अस्थिरतेतही हा स्टॉक मोठे परतावे देण्यास सक्षम आहे.
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)