TRENDING:

फुगा तर फुटणारच होता! 1929 सारखं पुन्हा घडायला नको, रिच डॅड पुअर डॅडच्या लेखकाने व्यक्ती केली भीती

Last Updated:

‘फुगा फुटत आहे आणि मला भीती वाटते की ही घसरण इतिहासातील सर्वात मोठी असू शकते.’ कियोसाकी यांनी असेही स्पष्ट केले की, त्यांनी अशा मोठ्या घसरणीबद्दल त्यांच्या पुस्तकांमध्ये आधीच इशारा दिला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: एकीकडे व्यापार युद्ध (Trade War) सुरू झाले आहे, तर दुसरीकडे अमेरिकन शेअर बाजारापासून (US Stock Markets) ते भारत आणि इतर आशियाई बाजारांपर्यंत मोठी अस्थिरता दिसून येत आहे. अमेरिकन बाजार कोसळल्यामुळे मंदी (Recession) येण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, ‘रिच डॅड, पुअर डॅड’ (Rich Dad, Poor Dad) या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी (Robert Kiyosaki) यांनी इतिहासातील सर्वात मोठ्या घसरणीचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट शेअर केली.
News18
News18
advertisement

रिच डॅड पुअर डॅटचे लेखक काय म्हणाले?

रॉबर्ट कियोसाकी यांनी मंगळवारी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर करताना म्हटले की, सध्या दिसणारी आर्थिक मंदी (Financial Recession) येत्या काळात 1929 मधील बाजारातील घसरणीलाही मागे टाकू शकते. त्या घसरणीमुळे महामंदी आली होती. आपल्या विस्तृत पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, ‘फुगा फुटत आहे आणि मला भीती वाटते की ही घसरण इतिहासातील सर्वात मोठी असू शकते.’ कियोसाकी यांनी असेही स्पष्ट केले की, त्यांनी अशा मोठ्या घसरणीबद्दल त्यांच्या पुस्तकांमध्ये आधीच इशारा दिला होता.

advertisement

कियोसाकी यांचा हा इशारा अशा वेळी आला आहे, जेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या टॅरिफ धोरणामुळे व्यापार युद्ध सुरू झाले आहे. याशिवाय, अमेरिकन बाजारात सातत्याने घसरण होत आहे. गेल्या सोमवारी Dow Jones 1100 अंकांनी कोसळला होता. Nasdaq निर्देशांकात सप्टेंबर 2022 नंतरची सर्वात मोठी घसरण झाली, ज्यामुळे तो 4% पेक्षा जास्त खाली गेला. याशिवाय, S&P 500 निर्देशांकही 2.7% घसरणीसह बंद झाला. त्यामुळे मंदी येण्याची शक्यता तज्ज्ञांनी पुन्हा व्यक्त केली आहे.

advertisement

2008 सारखी परिस्थिती पुन्हा तेच घडतंय

रॉबर्ट कियोसाकी यांनी जर्मनी, जपान आणि अमेरिकेच्या आर्थिक परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. ते म्हणाले, ‘काही अक्षम नेत्यांनी आम्हाला जाळ्यात अडकवले आहे. अशा वेळी अस्वस्थ आणि भयभीत होणे स्वाभाविक आहे, पण घाबरू नका, धीर धरा. याचा अर्थ – शांत राहा, दीर्घ श्वास घ्या, डोळे उघडे ठेवा आणि तोंड बंद ठेवा. 2008 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा मी थांबलो, घबराट दूर होऊ दिली आणि नंतर मोठ्या सवलतीत विक्रीसाठी उत्तम स्थावर मालमत्ता शोधू लागलो.’

advertisement

रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितलं प्लॅनिंग

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, "सध्याची परिस्थिती तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संधी देखील ठरू शकते." परिस्थिती कितीही अस्थिर असली तरीही धीर धरा आणि शांत राहा. इशारा देतानाच त्यांनी त्यांच्या गुंतवणूक योजनेबद्दलही सांगितले आहे. ते म्हणाले, "मी स्थावर मालमत्ता, सोने (Gold), चांदी (Silver) आणि बिटकॉइन (Bitcoin) खरेदी सुरू ठेवणार आहे." यापूर्वीही त्यांनी याच मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.

advertisement

मराठी बातम्या/मनी/Share Market/
फुगा तर फुटणारच होता! 1929 सारखं पुन्हा घडायला नको, रिच डॅड पुअर डॅडच्या लेखकाने व्यक्ती केली भीती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल