TRENDING:

भारताच्या सर्वात मोठ्या IPO ला सेबीकडून हिरवा कंदील, ऑक्टोबरमध्ये पैसे कमवण्याची संधी

Last Updated:

गुंतवणुकदारांसाठी आनंदवार्ता; मार्केटमध्ये लवकरच येणार भारतातील सर्वांत मोठा आयपीओ

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
गेल्या दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत भारतामध्ये इन्हिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) करणाऱ्या कंपन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेष म्हणजे त्याला गुंतवणुकदारांचा अभूतपूर्व प्रतिसादही मिळाला आहे. गेल्या वर्षभरात विक्रमी गुंतवणूक पाहिलेल्या दलाल स्ट्रीटवर सध्या डझनभर कंपन्या आयपीओ लिस्टिंगसाठी सज्ज आहेत. अशा कंपन्यांमध्ये एका जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनीचाही समावेश आहे. या कंपनीचा आयपीओ देशातील सर्वांत मोठा आयपीओ असेल, अशी शक्यता आहे. मार्केट रेग्युलेटर सेबीने 'ह्युंदाई मोटार कंपनी'च्या 25 हजार कोटी सेल ऑफरच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसला मंजुरी दिली आहे. हा आयपीओ ऑक्टोबरमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. ह्युंदाईचा आयपीओ एलआयसीचं 2.7 बिलियन डॉलर्सचं लिस्टिंग रेकॉर्ड मोडू शकतो. ह्युंदाई मोटार ही मूळची दक्षिण कोरियातील ऑटोमोबाईल कंपनी आहे. 'लाइव्ह हिंदुस्थान'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
नवीन आयपीओ लॉन्च
नवीन आयपीओ लॉन्च
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, सेबीने फूड आणि ग्रोसरी डिलिव्हरी कंपनी असलेल्या 'स्विगी'च्या आयपीओला देखील ग्रीन सिग्नल दिला आहे. ही कंपनी आपल्या आयपीओची साईज 1.4 बिलियन डॉलर्सपर्यंत (सुमारे 11,700 कोटी रुपये) वाढवेल, अशी तज्ज्ञांना अपेक्षा आहे. असं झाल्यास हा देशातील 5वा सर्वात मोठा इश्यु ठरेल. सूत्रांनी 'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या माहितीनुसार, स्विगीला आता सेबीकडे अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करावा लागेल. ऑफरची साईज वाढवण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात भागधारकांची बैठक होण्याची शक्यता आहे.

advertisement

स्विगीचा आयपीओ आपला कट्टर प्रतिस्पर्धी झोमॅटोच्या 9,375 कोटी रुपयांच्या इश्युपेक्षा मोठा असेल. झोमॅटोचा आयपीओ 2021 मध्ये लाँच झाला होता. मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर स्विगी, ओला इलेक्ट्रिक आणि फर्स्टक्रायसारख्या स्टार्टअप्सच्या गटात दाखल होईल. या दोन्ही स्टार्टअप्सनी या वर्षी स्टॉक एक्सचेंजमध्ये पदार्पण केलं आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला गुंतवणुकदारांसोबत शेअर केलेल्या वार्षिक अहवालात स्विगीनं म्हटलं होतं की, कंपनीला आर्थिक वर्ष 2023 मध्ये 4,179 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 2024 मध्ये कंपनीचा कन्सॉलिडेटेड लॉस 2,350 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला आहे.

advertisement

जेव्हा कंपन्यांना पैशाची गरज असते, तेव्हा ते शेअर मार्केटमध्ये स्वतःला लिस्ट करतात. कंपनी आयपीओद्वारे मिळालेलं भांडवल तिच्या गरजेनुसार खर्च करते. हा फंड कर्ज फेडण्यासाठी किंवा कंपनीच्या वाढीसाठी वापरला जाऊ शकतो. स्टॉक एक्स्चेंजवर शेअर्सचं लिस्टिंग केल्यानं कंपनीला योग्य मूल्यांकन मिळण्यास मदत होते.

ऑगस्टमध्ये 10 कंपन्यांनी सुमारे 17,047 कोटी रुपये उभारले होते. मे 2022 पासून आयपीओ पब्लिक ऑफरसाठी हा सर्वात व्यस्त कालावधी ठरला आहे.

advertisement

मराठी बातम्या/मनी/Share Market/
भारताच्या सर्वात मोठ्या IPO ला सेबीकडून हिरवा कंदील, ऑक्टोबरमध्ये पैसे कमवण्याची संधी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल