प्रत्येक जण आपल्या उत्पन्नातील काही रकमेची बचत करत असतो. यातून चांगला परतावा मिळावा अशी त्याची अपेक्षा असते. बहुतांश लोक बचत किंवा गुंतवणुकीसाठी एफडीचा विचार करतात. पण यातून मिळणारा परतावा तुलनेनं कमी असतो. त्यामुळे चांगले रिटर्न देणारा एखादा गुंतवणुकीचा पर्याय तुम्ही शोधत असाल तर तुमच्यासाठी एसआयपी फायदेशीर ठरू शकते. दरमहा एसआयपीत ठराविक रकमेची बचत करून तुम्ही कोट्यवधींचा परतावा मिळवू शकता.
advertisement
एसआयपीच्या माध्यमातून एखाद्या म्युच्युअल फंड किंवा इक्विटी स्कीममध्ये ठराविक रक्कम दरमहा जमा केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन अर्थात एसआयपीच्या माध्यमातून दरमहा ठराविक रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवता येते. यात तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा देखील फायदा मिळतो. यात बचत करण्यासाठी एका वेळी जास्त रकमेची गरज नसते. तुम्ही दरमहा तुमच्या उत्पन्नातील ठराविक रक्कम यात गुंतवू शकता.
जर तुम्ही दरमहा 7500 रुपये एसआयपीत गुंतवले तर तुम्ही एक कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभा करू शकता. समजा 25 वर्ष कालावधीसाठी तुम्ही दरमहा 7500 रुपये एसआयपीत गुंतवले तर 25 वर्षांत तुमची गुंतवणूक 22,50,000 रुपयांवर पोहोचेल. यात 10 टक्के व्याज दराने परतावा मिळाला तर 25 वर्षांनंतर तुम्हाला 1,00,34,178 रुपये मिळू शकतात. यात तुमची बचत 22,50,000 रुपये असेल. यात तुम्हाला 77,84,178 रूपयांचा फायदा होईल. त्यामुळे एसआयपी हा बचत किंवा गुंतवणूकीसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.