या कोसळणाऱ्या मार्केटमध्ये आज ट्रेड करु नये, आज होल्ड करावं, स्थिती पाहावं कारण आज प्रचंड मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकण्याची घाई केली तर मोठं नुकसान होऊ शकतं. पैसे लावण्याची ही संधी मात्र रिस्क खूप मोठी आहे त्यामुळे डायरेक्ट कॉल न घेता शॉर्टलिस्ट करुन पैसे गुंतवावेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. लाँग टर्मच्या अनुशंगाने आज पैसे गुंतवण्यासाठी संधी आहे असंही काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
advertisement
CNBC आवाजने दिलेल्या वृत्तानुसार तज्ज्ञ मानस यांनी सध्या वेट अॅण्ड वॉचची भूमिका घ्यावी, विकण्याची किंवा घेण्याची घाई करू नये. पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. तर काही तज्ज्ञांनी बँकिंग, कन्झमशन, ऑईल, एफएमसीजी सारख्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हे शेअर हळूहळू वाढतील मात्र मोठं नुकसान होणार नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
बाजारची सुरुवात झाल्यानंतर 2200 अंकांनी कोसळला होता. निफ्टी 800 हून अधिक अंकानी कोसळला होता. INDIA VIX 45 टक्क्यांहून अधिक अंकांनी कोसळला होता. बँक निफ्टी, निफ्टी 50, आयटी, ऑटो सेक्टरचे स्टॉक्स मोठ्या अंकांनी कोसळले आहेत. मिडकॅप आणि स्मॉलकॅपलाही याचा मोठा फटका बसला आहे. एकूणच शेअर मार्केटमध्ये प्रचंड दबाव असल्याने आज ब्लॅक मंडे ठरणार का याकडे तज्ज्ञांचं आणि गुंतवणूकदारांचं लक्ष असणार आहे.
सोने आणि चांदी देखील एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे. COMEX वर सोन्याचा भाव प्रति औंस 3000 डॉलर च्या खाली घसरला आहे. चांदीही 4 महिन्यांतील नीचांकी पातळीवर घसरली आहे. COMEX वर चांदी 30 डॉलरच्या खाली घसरली आहे. मंदी आणि घटत्या मागणीच्या भीतीमुळेही कच्च्या तेलाच्या किमतीत ही मोठी घसरण दिसून येत आहे.