शुक्रवारी मार्केटची स्थिती
28 फेब्रुवारी महिना अखेर आणि शुक्रवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. अमेरिकेने टॅरिफबाबत घेतलेल्या निर्णयानंतर शेअर बाजार कोसळला. रिकव्हरी कधी सुरू होईल असा प्रश्न आता गुंतवणूकदारांना पडला आहे. जर आता रिकव्हरी झाली तर गुंतवणूकदारांना रिटर्न्स चांगले मिळतील, जर आणखी घसरण झाली आणि त्यानंतर रिकव्हरी झाली तर मात्र मोठा फटका बसण्याचा धोका आहे. त्यामुळे शेअरमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले त्यांनी होल्ड करायचे की काढायचे असा प्रश्न आहे. याचं उत्तर थेट तज्ज्ञांनीच दिलं आहे.
advertisement
तज्ज्ञ सुदीप बंदोपाध्याय काय म्हणाले?
सीएनबीसीने दिलेल्या वृत्तानुसार बाजार तज्ज्ञ सुदीप बंदोपाध्याय यांच्या मते, पहिला संकेत देशांतर्गत अर्थव्यवस्थेतून येईल. जीडीपी वाढीला पुन्हा गती मिळाली पाहिजे. यासोबतच कंपन्यांचे तिमाही निकालही सुधारणे आवश्यक आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय मार्केटमधील अस्थिरता कमी झाली पाहिजे. चौथ्या तिमाहीपासून सुधारणांची चिन्हे दिसू शकतील अशी आशा त्यांना आहे.
लार्ज कॅपची काय स्थिती?
सीएनबीसी आवाजने दिलेल्या वृत्तानुसार अँसिड कॅपिटलचे अनुराग सिंग यांच्या मते, बाजारातील वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये परिस्थिती वेगळी असते. देशातील लार्ज कॅप आणि टॉप १०० कंपन्यांमध्ये कोणतीही समस्या नाही. निफ्टीमध्येही कोणतीही समस्या नाही. मूल्यांकन ठीक आहे. त्यांच्या मते, आता मूल्यांकन कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत कारण खरेदीदार देखील पैसे गुंतवण्याची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत, एफआयआयची विक्री थांबताच, या कंपन्यांमध्ये पुन्हा चांगले रिटर्न्स मिळण्याची चिन्हं दिसून येतील.
मिड आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूकधारांनी काय करावं?
जर मिड आणि स्मॉल कॅपमध्ये आणखी सुधारणा झाली, तर डेटा दर्शवितो की पुन्हा उच्च पातळी गाठण्यासाठी 4-5 वर्षे लागू शकतात. जर देशांतर्गत गुंतवणूकदार आणि एसआयपी गुंतवणूकदार पुन्हा या क्षेत्रात उतरले तर ही वाढ थोडी लवकर दिसून येईल. तथापि, मोठ्या कंपन्यांसाठी संकेत स्पष्ट आहेत. इथे काहीच अडचण नाही. जागतिक अनिश्चितता संपताच येथे गती येईल.