अॅक्सिस बँक लिमिटेड
अॅक्सिस बँक लिमिटेड शेअरचा लेटेस्ट अॅव्हरेज स्कोअर 9 आहे. तो शेअर खरेदी करावा, अशी शिफारस 40 मार्केट तज्ज्ञांनी केली आहे. या शेअरमध्ये सुमारे 40 टक्के तेजी येणाऱ्या अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
एचडीएफसी बँक लिमिटेड
एचडीएफसी बँक ही देशातली सर्वांत मोठी खासगी बँक आहे. त्या बँकेच्या शेअरचा सध्याचा अॅव्हरेज स्कोअर 7 आहे. त्या शेअरबद्दल 39 विश्लेषकांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्या सर्वांचं असं म्हणणं आहे, की त्यात 42 टक्क्यांहून अधिक तेजी येण्याची शक्यता आहे.
advertisement
सीएसबी बँक लिमिटेड
सीएसबी बँक लिमिटेड हा मिडकॅप बँकिंग स्टॉक असून, त्याचा सध्याचा स्कोअर 8 आहे. दोन मार्केट तज्ज्ञांनी हा शेअर खरेदी करण्याचं स्ट्राँग रेटिंग दिलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार येत्या 12 महिन्यांत हा स्टॉक 53 टक्क्यांहून अधिक तेजी प्राप्त करू शकतो.
बँक ऑफ बडोदा
बँक ऑफ बडोदाच्या शेअरबद्दल तज्ज्ञांनी रेकमंडेशन दिलं आहे. 31 तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की हा शेअर खरेदी करावा. कारण पुढच्या एका वर्षात हा शेअर 32 टक्क्यांहून अधिक तेजी नोंदवू शकतो.
डीसीबी बँक लिमिटेड
डीसीबी बँक लिमिटेडचा शेअर खरेदी करण्यासाठी 19 तज्ज्ञांनी स्ट्राँग रेटिंग दिलं आहे. त्या शेअरमध्ये 45 टक्क्यांहून अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा स्मॉलकॅप कॅटेगरीतला प्रसिद्ध स्टॉक आहे.