या क्षेत्रांमध्ये शेअर्स देतील बक्कळ रिटर्न
BofA चा असा अंदाज आहे की, निफ्टीमध्ये होणारी वाढ ही प्रामुख्याने दूरसंचार, वित्तीय, औद्योगिक, ऊर्जा, आयटी आणि ऑटो या क्षेत्रांमुळे असेल. या क्षेत्रांचा एकत्रित वाटा निफ्टीच्या एकूण वाढीमध्ये 90 टक्के इतका असेल असा अंदाज आहे. याशिवाय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) व्याजदरांमध्ये कपात होण्याची शक्यता आहे ज्यामुळे वित्तीय आणि पत वाढीला चालना मिळेल आणि त्याचा फायदा बँकिंग क्षेत्रालाही होईल.
advertisement
मिड आणि स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट
दुसरीकडे, BofA ने छोट्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांच्या (स्मॉल आणि मिडकॅप) शेअर्सबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, या कंपन्यांचे शेअर्स अजूनही महाग आहेत आणि त्यामुळे गुंतवणूकदारांना तोटा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
BofA ने दिला सल्ला
BofA ने 12 स्टॉकना 'बाय' रेटिंग दिले आहे, म्हणजेच या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामध्ये HDFC लाईफचा समावेश आहे ज्यामध्ये सर्वाधिक वाढ होण्याची क्षमता आहे. BofA ने या शेअरसाठी 875 रुपयांची टार्गेट प्राइज निश्चित केली आहे जी सध्याच्या किमतीपेक्षा जवळपास 42% जास्त आहे. या यादीत दुसरे स्थान महिंद्रा अँड महिंद्रा (M&M) या कंपनीचे आहे. या शेअरसाठी 3,650 रुपयांची टार्गेट प्राइज निश्चित केली आहे जी सध्याच्या बाजारभावापेक्षा 33% जास्त आहे.
शेअर बाजारात सुधारणेचे संकेत
दरम्यान, शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली आहे. सेन्सेक्स निर्देशांक 610 अंकांनी वाढून 74,340 वर बंद झाला. सततच्या घसरणीनंतर, ही सुधारणा गुंतवणूकदारांना दिलासा देणारी आहे.
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)