इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादनासाठी जगभरातल्या कंपन्या भारताची निवड करत आहेत. मोबाइल फोन्स, ऑटोमोटिव्ह आणि इंडस्ट्रियल क्षेत्रांमध्ये वाढती डिमांड आणि असेम्बी युनिट्सनी या क्षेत्राच्या विकासात मोठी भूमिका निभावली आहे. सरकारची प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह योजना आणि सेमिकॉन इंडिया कार्यक्रमासारखी धोरणं, देशांतर्गत मागणीत वाढ आणि आत्मनिर्भर भारत चळवळ यांमुळे या क्षेत्राला अधिक गती मिळाली आहे. मोतिलाल ओसवाल संस्थेच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिस सेक्टरमध्ये ही तेजी म्हणजे गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी आहे. त्यांनी पाच अशा कंपन्या निवडल्या आहेत, की त्यांना या क्षेत्रातल्या वृद्धीचा लाभ मिळेल. या शेअर्समध्ये पुढच्या 12 महिन्यांत 20 टक्क्यांपासून 25 टक्क्यांपर्यंतच्या वाढीची शक्यता आहे.
advertisement
डिक्सन टेक्नॉलॉजिज : ही कंपनी आपली मोबाइल उत्पादन क्षमता आणि नव्या सेगमेंटमध्ये प्रवेश करून सातत्याने नफा कमावत आहे. बॅकवर्ड इंटिग्रेशनसह अन्य मार्गांच्या माध्यमातून ही कंपनी आपली बाजारस्थिती मजबूत करत आहे. या शेअरची सध्याची किंमत सुमारे 16,795 रुपये आहे.
सीजी पॉवर : क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज ही कंपनी वीजनिर्मिती, ट्रान्समिशन आणि वितरणाशी निगडित उत्पादनं म्हणजेच मोटर्स, ब्रेकर्स, स्विचगीअर्स आदींची निर्मिती करते. या कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत सुमारे 760 रुपये आहे.
केन्स टेक : इंटरनेट ऑफ थिंग्ज एनेबल्ड असलेली ही कंपनी आपलं हेल्दी ऑर्डर बुक आणि उत्तम मार्जिन्ससाठी ओळखली जाते. 2028 या आर्थिक वर्षापर्यंत एक अब्ज डॉलर्स एवढा रेव्हेन्यू प्राप्त करणं हे कंपनीचं उद्दिष्ट आहे. या कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत सुमारे 6170 रुपये आहे.
अॅम्बर एंटरप्रायझेस : एसी इंडस्ट्रीत चांगल्या कामगिरीनंतर ही कंपनी आता ऑटोमोटिव्ह, डिफेन्स, मेडिकल आणि टेलिकॉम यांसारख्या क्षेत्रांमध्ये नवे क्लायंट्स मिळवत आहे. या शेअरची किंमत सुमारे सहा हजार रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे.
सिरमा एसजीएस : ही कंपनी ईएमएसच्या माध्यमातून ऑटोमोटिव्ह, हेल्थकेअर आणि कंझ्युमर प्रॉडक्ट्स यांसारख्या क्षेत्रांना सेवा देते. 4800 कोटी रुपयांच्या ऑर्डर बुकसह कंपनीने 2025च्या आर्थिक वर्षातल्या आपल्या 4500 कोटी रुपयांच्या महसुलाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे. या शेअरचं सध्याचं मूल्य 581 रुपयांपेक्षा अधिक आहे.
इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगच्या या उदयोन्मुख क्षेत्रात गुंतवणूकदारांसाठी मोठ्या संधी आहेत. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास आगामी काळात चांगला परतावा मिळू शकतो.
(इथे दिलेला सल्ला फक्त माहितीच्या दृष्टीने असून, प्रत्यक्ष गुंतवणुकीच्या आधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट सल्लागाराकडून सल्ला घ्यावा.)